Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ शुद्ध ८ मंगळवार शके १७१५.
विनंति. उपरि राजश्री आनंदराव नरसिंह येथें आले, भेट जाली, वर्तमान समजलें. मारनिलेनीं हलीं पत्रें पुण्याकडे दिल्हीं आहेत तीं रवाना केलीं वि।
१ तुमचे नांवे, लखोटापत्रें पाहून उत्तरें यावीं.
१ मालोजी राजे घोरपडे यांचा लखोटा.
१ अबदुल गनीखां हकीमजी आदितवार पेठेंत.
१ बालंमा देसाई गुंड मटकलकर लखोटा सिदगीर गोसावी याचे मठांत अथवा आपाज़ी बाबाजी आठवले यांजपासी द्यावा.
------
४
सदरहू च्यार लाखोटे जिकडील तिकडे पावते होऊन उतरें येतील तीं इकडे रवाना करावीं. रा छ. ७ जिल्हेज हे विनंति.
टपा रवाना पुणें छ. १५ रोज.
आषाढ़ व. १ बुधवार शके १७१५.
राजश्री गोविंदराव स्वामीच सेवेसीं.
विनंति. उपरि तुह्मी छ. २९ माहे जिल्कादचीं पत्रें पाठविलीं तीं छ. ५ माहे जिल्हेजीं पावलीं. याचीं उत्तरें राजश्री नानाचे नांवाचीं पत्रें दिल्हीं. सर्व मजकुर समजला म्हणोन लिहिलें तें कळलें. कलम.—१
होळकर महेश्वरास येणार म्हणोन लिं तें कळलें. इंदुरास आले. अलीकडे हि येतील. सरदारीची मजा राहिली नाहीं. स्त्री नायेक, बाल नायेक आणि बेमसलहत-तीन गोष्टी येके ठिकाणीं चवथा आहंकार, तेव्हां ईश्वर त्या सरदारीची आबरो ठेवील तर ठेवो! कलम---१
सुरापुरकराचे कारभारी येथें आले, सरकारांत बोलून येकोपा ठरला, देवदुर्ग नजर वगैरे ठराव जाहला, नवाबास साहित्यपत्रें दिल्हीं, इत्यादिक तपसील या उपरि लिहीन म्हणोन लिं. त्यास साहित्यपत्रें व गोपाळ आपा यानीं लवकर यावें, देवदुर्गप्रकर्णी याचें मनांत विपरीत आलें आहे. तिकडे फौज मध्यस्तानीं कांहीं बंदोबस्ताविसीं पाठविली ऐसें ऐकण्यांत. शोध घेऊन बोलण्यांत येईल. परंतु तिकडून पत्रें जरूर लवकर यावीं म्हणजे बोलण्यास दुहेरी नेट पडेल विस्मरणांत येऊं नये. कलम---१
राजश्री पाटील बाबा सरकारवाड्यांत दोन वेळ व येक वेळ नानाचे येथें आले होते, तीन खलबतें जालीं. श्रीमंताचें दैव थोर ! राजश्री नाना, तात्या, पाटीलबाबा, तिघेहि थोर समंजस, तिघांसही दौलतीची काळजी आहे, इत्यादिक मजकूर लिहिला तो कळला, त्यास ईश्वराजवळ हेंच मागणें आहे त्रिवर्गाची ऐकता (ऐक्यता ) यांतच दौलतीची बोहबुदी आहे. कलम ---१
बाळाजी व्यंकटेश व येमा खिदमतगार आले. ज्या कामास आले तें होत आहे. त्यास आपली निशा होऊन चिठी आली पाहिजे, याविसी कसें म्हणोन लिं. त्यास निशा जाली. परंतु येक चिठी येणें त्याचा खोळंबा आहे. त्याविषईं पूर्वी लिं आहे त्याप्रमाणें सैदास सांगून चिठी आणून पाठवावी. त्या ग्रहस्ताकड़ील पत्र आम्हास आलें होतें, त्याचा जबाब आम्हीं पाठविला कीं चिटी लवकर यावी, त्याविसीं खोळंबा आहे, ताकीदपत्रें तयार आहेत, चिटी आली म्हणजे पत्रें तुम्हासी पोंचतील, त्यास येविषंई तुम्ही सैदास सांगून करवावें कलम.-----१
पांच कलमें र। छ. १५ जिल्हेज हे विनंति, चीनापटणच्या दोन आखबारा पा आहेत. प्रा करावें; हे विनंति.