Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आषाढ वा १ बुधवार शके १७१५

मध्यस्ताचा उद्गार निघाला तो राजश्री नानास लिहिला आहे. त्याजवरून कळेल. हे विनंति.
पु॥ राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी. विनंति. उपरि छ. १३ जिल्हेजीं ईदीचे नजरेकरितां आह्मी नवाबाकडे गेलों. मध्यस्त समीपच होते. लोकांच्या नजरा झाल्यानंतर मध्यस्तांनीं अर्ज केला कीं, पुण्याहून चोबीना खरेदी करविला, त्यापैकीं पंच्यायैसी हजार रुपयांचा खरीदी जाला. पांचगजी नावा मिळाल्या. साहागजी व सातगजी तेथें नाहींत. सबब संगमनेराकडे खरीदी करण्यास गोविंदराव भगवंत यांनीं एक कारकून व रघोत्तमरायाकडील एक याप्रा रवाना जाले आहेत. दोन लाख रुपयापैकीं पंच्यायेसी हजाराचा चोबीना खरीद जाला. बाकीचा तेथें होणार. त्यास कोंकणपटीचा चोबीना भीमेचे पाण्यानें ताफे बांधून कलबर्ग्यास येईल. तेथून बेदरास आणावा लागेल. ताफे बांधण्याकरितां लांकडें खरीदी करावीं लागतील यैसेंही रघोतमराव यांनीं लिहिलें. सदर्हूप्रों चोबीना कलबुर्ग्यास येईल. मुजाका नाहीं लेकीन संगमनेर प्रांतीं जो चोबीना खरीदी होईल तो गंगेचे पाण्यानें वंजरासंगमास आणावयाचा पहिला बेत होता. परंतु यांत मोठी अडचण आहे कीं वंजरा-संगमास चोबीना दाखल जाल्यानंतर तेथून बेदरास वंजरेचे पाण्यानें येणें मुष्कील, सबब कीं, वंजरेचा वोघ फार नीच आहे. तेथून येणार नाहीं. ज्या ठिकाणीं चढवून आणावयाचा तेथून आणावयास प्रयत्न फार. याकरितां वंजरासंगमास चोबीना न आणितां गंगेचे पाण्यानें नांदेड येथें आणावा. तेथून बेदरास आणावयाची तजवीज वंजरेनें अथवा भारबरदारी पाठवून खुष्कींतून जशी सोये तशी करितां येईल. याप्रों अर्ज केल्यावरून गंगेचे पाण्यानें नांदेडास चोबीना आणावा याप्रों नवाबांनीं फर्माविलें. भीमोघानें कलबर्ग्यास येणार याची सलाह कशी? ह्मणोन महमद अजीमखां यांस मध्यस्तांनीं विच्यारिलें. त्यांनीं सांगितलें कीं कलबर्ग्यानजीक फेरोजाबाद व शाहाबाद हे दोन गांव भीमातीर तीन कोस कलबर्ग्यापासोन आहेत. तेथें चोबीना आणवावा, तेथून भारबरदारी सरंजाम पाठवून बेदरास आणावयाची तरतूद होईल. याप्रों बोलणें जालें. रघोत्तमराव यांनीं मध्यस्तांस लांकडाविषयींचा मार लि. त्यावरून मध्यस्तांनीं सदरहूपों बयान केला. याजवर हें बोलणें जालें. लांकडाविषींचा व बंदुखाचा मार तुह्माकडून इकडे कांहींच लिहिण्यांत आला नाहीं. येथें बोलणें जालें तें कळावें सबब लिहिलें असे. र॥ छ, १५ जिल्हेज हे विनंति.