Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
(शके १७१५ वैशाख वद्य ११ मंगळवार. )
पु॥ राजश्री गोविंदराव स्वामींचे सेवेशि,

विनंति उपरि. “बनबरी वगैरे बदोबस्तास बाजू राहून वलि हुसेन खां फौजसरंजाम समवेत जाणार. गजिंद्रगड तालुक्याचाही बंदोबस्त करतील ' याची इतला लिहिण्याविषयी मध्यस्तांनी सांगितल्याप्र।। पेशजी इकडून लिहिले होते. त्याचे उत्तर तुह्मांकडून आले की:---“पापण्णापंत याचा कारकून पांच सहा महिने येथें आला आहे. राजश्री भाऊही होते. मोठे काजी याचे जलसे होऊन टिपू सुलतान यांचे तहप्र।। गांवखेडीं सोडून देविलीं; व तहपासोन वासलातिचा ऐवजही माघारा देविला. सनदापत्रें - कांहीं गुंता राहिला नाहीं. रामराव दोचौं दिवशीं जाणार.” इत्यादिक लि। मध्यस्तास सांगितलें. संतोष पावोन बोललें कीं, “मोठी गोष्ट व चांगली ती जाली. इतका प्रकार तेथें जाला. परंतु, रघोत्तमराव यांजकडून आह्मांकडे ये विषयींचा लेख अद्याप आला नाहीं. येईल.” या प्रा। बोलणें झालें. र॥ छ. २ जिलकाद हे विनंति.