Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ट व. २ मंगळवार शके १७१५.
विनंति ऐसी जे-सालगिरेचे नजरांचा .... .... होत असतां नवाबासमीप मध्यस्त व मी व मीरआलम होतों, नवाबांनी आह्मांकडे झुकून बोलण्यास आरंभ केला की * हिंदुस्थानांत राव शिंदे यांजकडील सरदार फौजसुधा आहेत. त्यांसीं व होळकर यांसीं पहिली लढाई मातबर होऊन होळकर यांची सिकस्त जाली. पुन्हा लढाईचे इराद्याने महेश्वराकडून जमीयत कुमकेस आली. त्यासहित होळकर याजपासीं जमा व पोख्त सरंजाम जाला इतक्यावर लढाई जाली असतां कसें घडेल ? हा दाबरोआब सर्वांत दिसो लागला. अशा समयांत सिंदे यांजकडील सरदारासी व होळकरासी सलूखाची ........ ठरून अखबारा आल्यावरून चिता-.... .... जाली होती कीं सरदार आपसांत समजोन म.... .... जाला. सुलह ठरली. हें फार चांगलें जालें. ऐसें असतां मागाहून मल्हारराव होळकर आले. त्यांनीं, आपले वडिलास निर्भर्छनापूर्वक बहुतु कांहीं बोलून, सेवटीं लढाई न करी त्यास फलाण्या शपथा याप्रा ज्या गोष्टी न बोलावयाच्या त्या बोलण्यांत आणून, जंग सुरू केली. सिंदे यांजकडील फौज सरंजाम मजबूत. लडाईचा ताबा न सोसतां होळकराकडील मोड जाला. कितेक सरदार शिपाई लोक बहुतकरून ठार व जखमी झाले. कितेक फरारी होऊन पसपा (?) जाले. त्यांचा पाठलाग सिंदे यांजकडील लोकांनीं केला. लुटले गेले. याप्रा। वर्तमान आलें. त्यावरून वाईट वाटलें, कारण कीं राव पंतप्रधान यांचे दौलतीतींल उभयतां सरदार ......... मातबर आपसांत असा कलह वाहडणें हें स-........ नाहीं. त्यांत एकवेळ लढाई पहिली जाली. ............ फौजैचा जमाव होळ करापासी चांगलाच जम-........ .... दाबाचे पोटीं सलुख ठरला. इतक्यानें दाव सलाबत मोठी होती. ते मल्हारराव यांचे ज्याहेलीमुळें हे खराबी ! मोठा सदमा गुजरला.'' याप्रा नवाब बोलत असतां मध्यस्तांनीं मधीं छुट चालविली कीं “दोनही सरदार उमदा. हजरतीस समान, बलकी होळकर यांची भेट व दाट परिचय आहे. असा कांहीं सिंदे यांजकडील भेटगोष्टींचा दंडकही नाहीं. होळकरावर हे नौबत गुजरली, सबब खफगांस जागा." याप्रा बोलणें झालें. रा छ, १५ जिल्काद हे विनंति.