Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

यार घटिका दिवस शेष अतां नवराज्यांची साअत हैदराबादेहुन नवाजवं. अलीखानाने पोषाग तयार करउन पाठविला तो गुजरा ( णिला ). च्यार घटिका दिवस राहतां पोषाग घेऊन नवराज्याचा समारंभ शुरु जाला. दौलाची अर्जी गुजरली. पांच घटिकां रात्री नवाब जनान्यासहित दौलाचे मकानास आले. बरामद होऊन दौला व मीर आलम व सलाबतखां वगैर इसमांचा सलाम जाला. नवरोजीच्या नजरां दौलां वगैरेनीं केल्या. दिल्लीवाले कंचनीचा नाच जाला. बहलोलखान वगैरेस खिताब सर्फराजी जाली. अतषबाजी रोशनी पाहून प्रहर रात्री आपले हवेलीस गेले. छ १८ रोज शुक्रवारी दोन घटिकां दिवसां नवाब सवार होऊन शिकारीस गेले. तेथुन उमदा बेगमचे बागांत आले आमराईमधे भोजन व आराम करुन येक प्रहर पांच घटिका दिवसां हवेलसि आले. रात्री दौलाची अर्जी गुजरली. येक प्रहर पांच घटिकेस कंचन्याचे नाचाचा बंदोबस्त होऊन नाच व अतषबाजी जाली. छ १९ रोज मंदवारी येक प्रहर येक घाटेकां दिवाणखान्यामधे नवाब बरामद जाले. रायराया यांनी खाना पाठविला, तो गुजरला. येक प्रहर पांच घटिकेस बरामद होऊन मीर पोलादअली व सुभानअली व तेमुरअली व झुलफुकारअली साहेव जादे च्यार यांच्या ख्वाबगामध्यें बलाऊन घेतले. त्यांनी नजरा केल्या. भोजन जालें, च्योर साहेब जादे यांस च्यार फुलाचे हार दिल्हे. त्यांस वाटें लाविलें. ते आपलाले मकानास गेले. पागेकडील बारागरांच्या नजरा घेऊन दोन प्रहरास बरखासे जाले. रात्री दौलानी अर्ज गुजरली, जनान्याचा बंदोबस्त व नाच होता. छ २० रोजी रविवारी चौघे साहबजादे यांचे जनान्याची याद केली. ते जनाने देवढाने येऊन त्यांचे भोजन जालें. दिवसां दरबार नाही. रात्री चार वटिकेस नवाब दौलाचे मकानास आले. जनान्याचा बंदोबस्त होउन दौलांचा व गफुरजं. गचा व मीर आलम याचे जनान्याचा नजरा जाल्या. सात वटिकेस चां. दणीचे फर्मावर नवाब बरामद जाले. दौला व मारआलम व रायराया वगैरे मामुली लोकांचा सलाम जाला. नजराही कियेकांनी केल्या. रानीची याद केली. ते आले. सलाम जाला, दिलेवाले कंचनीचा नाच होता. दौला, रावजी । मीर आलम तिघांस खिलवत होते. येक प्रहर पांच घटिकेस बरखास जाले, छ २१ रोज सोमवारी प्रातःकालीं नवाब सवार होउन नागझरीस गेले. सैर करुन येक प्रहर चार बटिकेस आले. रात्री खैर सला. छ. २२ रोज मंगळवारीं तीन घटिका दिवसां नवाब सवार होउन गेले. सैर करुन येक प्रहर पांच घटिकेस आले. प्रहर दिवस असतां किल्यांतील छपरास आग लागुन दोन चार घरे जळाली. रात्री पांच वटीकेस दौलाचे मकानास..नवाब गेले. साहेबजादे व दौला पागावाले वगैरे मामुली इसमांचा सलाम होउन नजरा जाल्या. रावजीची याद केली. ते आले. दौला व रावजी उभयतांसी खिलवत जालें. साहेबजादे आदिकरून मनसब व खिताब सर्फराजी जाली. कंचन्याचा नाच होता. येक प्रहर पांच वटिकस बरखास जाले. छ २३ रोज बुधवारी तीन घटका दिवसां नवाब सैर करावयास गेले. येक प्रहर च्यार घटिकेस आले. च्यार घटिका दिवस राहतां असद आलखान आल्याचा अर्ज जाला. मगरबाचे समंई मीर पोलादअली वगैरे साहेबजादे चैथे हजर होउन त्यांनी सर्फराजीच्या नजरा केल्या. चौघांस गुलाबाचे हार दिल्हे. ते आपले ठिकाण्यास गेले. पांच घटिका रात्री नवाब दौलाचे मकानास आले, दौला व असद आलीखान वगैरे लोकांचा सलाम जाला, असद आलीखा व त्याचे पुतण्यास खिताब मनसत्र सर्फराजा जाली. दिलेवाली कंचनीचा नाच पाहुन येक प्रहर पांच घाटकंस हवेलीस गेल, छ २४ रोज गुरुवारी तीन घटिका दिवसां नवाब सवार होउन अभानुदीन साहेबाचे गुमजाकडे गेले. पागीवाले व अर्जबेगी वगैरेचा सलाम जाला । सवदागरी उट कसे पंचावन पाहिले. पसंद करुन दाग करण्याचा हुकूम जाला, गुमजापुढे पैनास रु देउन येक प्रहर दान घटिकेस हवेलीस आले. 

रात्रीं दौलाची अर्जी गुजरली, छ २६ रोज शुक्रवारी देन घटिका दिवसां बामणी बादषाहचे गुमजाकडे नवाब सवार होउन गेले. तेथून बंदै नवाबाचे वस्तादाचे गुमजापासीं जाउन शंभर रु॥ पुढे ठेविले. कबरेवर किमखावी चादर वातला. फात्या देउन भेाजन जालें. दीन प्रहरीच अमलांत हवेलीस आले. रात्रौ दैलाची अर्जी गुजारली. छ २६ रोज मंदवारी व्यार घटिका दिवस नवाब बागामधे जनान्यासहित गेले. आषज्याउलमुलुक दारोगे बवचीखान यासे खाना यहतीयातीने रावजीकडील घेउन येणेंयाचा हुकुम जाला, ते आले. ते खाना घेऊन नवाबांकडे गेले. भोजन जालें, देान प्रहरास हवेलीस आले. रायचुराहून मुस्तकीमजंग व अनवरुदाला वगैरे आले. खजीन वगैर सरंजाम अदानी रायपुरचा आला, अर्ज जाला. रा छ २९ षाबान हे विज्ञापना.