Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
चैत्र शु. १ शनिवार शके १७१७.

विनंती विज्ञापना. शिमग्याचे दिवसांत पागावाले यांस नाच पाहण्याकरितां वर्षास आम्हीं बोलावीत असत. त्याप्रों सालमारी घांसीमियां व अजमखान व सर बुलंदजंग यांस बोलाविलें. अजमखान घांसींमया यांनी नवाबांच परवानगी घेऊन छ १४ घाबानी रात्रीं आले. नाच रागरंग जाला, सर बुलंदजंग यांनी सांगोन पाठविलें की हजुरची परवानगी घेऊन उदईक येतो, त्याप्रो जंग मजकुर छ १८ रोजी आले होते. नाच पाहुन अतरे पान दान देऊन रुसकत केले. राा छ २९ माहे घाबान हे विज्ञापना.