Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
चैत्र शु. ३ गुरुवार शके १७१६.

विनंती विज्ञापना. बेदरचे किल्यांत नबाव पेशजी राहिले, त्या जायाच्या दुरुस्ती करुन दिवाणखाना व येक दोन मकाणे चांगली तयार केली. मंगळवार पेंट येथे नबाव छ ११ षाबानी दाखल जाल्यापासन वीस दिवस राहिले. सांप्रत माहे रमजान, राजे यांचा महिना. सैर शिकारीस जाणे येणे यांत लोकांस तसदी. यांजकरिता हा महिना किल्यांत राहावे, वैसी तजवीज ठरुन कुल असबाब छ १ रमजानी किल्यांत रवाना केला. छ २ रोज गुरुवारी पांच घटका प्रथम दिवसां नवाब हाथीवर पिस्ताई आंबराईमध्यें सवार जाले. खवासींत दौला व मीर अल। उभयतां होते. सात घटिका दिवसां किले बेदरचे हवलांत दाखल जाले, रमजानचा महिना किल्यांत राहुन मागता मंगळवार पेटेंत येउन राहण्याचाही बेत आहे. मंगळवारांतील जाग्याचा बंदोबस्त चौकी पाहारे आहेत. र॥छ २ माहे रमजान हे विज्ञापना.