Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.   
चैत्र शु. ३ गुरुवार शके १७१६.

विनंती विज्ञापना. छ २ घावानी रात्री दौलांकडे गेलो होतो. राज्याजी व रावरंभा वगैरे होते. दोन घटिका वैठक जाली. इतक्यांत दौलाचे चबुत्र्यावर फर्घ तयार होऊन नवाब आले. बरामद जाले व मजला बोलाउन घेतलें. मर आलम असद अलीखान वगैरे तमाम दरबारची मामुलीं इसमें होती, कितेकांच्या नजरा नवराज्यासमंधे जाल्या असद अलीखानाचे पुत्रास खिताब मनसव वगैरे खानीचेही खिताब सर्फराजी जाली. पुन्हा भांडाचा नाच होता. नबाव मजकडे पाहुन बोलिले की तुम्हीं खाना पाठविला तो बहुत पसंद. त्यापैकीं येक येक पदार्थाचे वर्णन करुन तारीफ केली. दौलाही त्यांस अनुमोदन देत गेले. दोन घटिका बैठक जाली. लोदीखान वगैरे लोकांचे नजराची दाटी होती. साहा घटिका रात्री नवाब बरखास जाले. आणिखी बोलिले कीं येकवेळ बहुत पदार्थ असले ह्मणजे यथास्थित स्वाद सर्वांचा समजत नाहीं. मी सांगुन पाठवीन ते वेळेस दोनतीन पदार्थ करुन पाठवीत जावे, ह्मणजे स्वाद समजेल. जसी आज्ञा होईल त्याप्रमाणे पदार्थ करुन पाठवीन अणोन बोलुन निरोप घेतला. र॥छ २ माहे रमजान हे विज्ञापना.