मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
पौष व. २ शनिवार शके १७१५ ता. १८ जानेवारीं १७९४.

विनंती विज्ञापना. नवाबाकडील जासुदाचा सवाई नाईक यास दौलांनी येथुन पुण्याकडे छ. १४ जाखरीं पत्रें समागमें देऊन बाबाराव गोविंद यांजपासीं जाण्याचें सांगोन खाना केलें. तो येथून दरमजल गेला. येकवीस दिवसांत सवाई नाईक यानें फिरोन हजुर यावें यैसी ताकीद त्याजला दौलांनी केली आहे. सवाई नाइक याचे समागमें हरका-याच्या जोड्या च्यार दिल्या आहेत. यैसेंही यैकिलें कीं सवाई नाइक यानें बाबाराव यांची पत्रें नवाबांकडील डांकेवर परभारां रवाना करीत जावीं. पूर्वी रघोत्तमराव यांजपासीं लाखोटे येऊन रवाना होत होते. तसें असूं नये. याजकरितां नाइकास पाठविलें. दोहींतुन कोणता प्रकार होते हें निदर्शनास येईल.रा। छ, १५, माहे जाखर हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries