मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
पौष व. १ शुक्रवार शके १७१५ ता. १७ जानेवारी १७९४.
रा छ, १४ जाखरीं डांकेवर.

श्रीमंत राजश्री----------------------रावसाहेब
स्वामीचे सेवेसीं -----------------------

विनंति सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक सा। नमस्कार विनंति विज्ञापन' ता छ. १४ माहे जमादिलाखरपर्यंत स्वामीचें कृपेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असें विशेष, राजश्री गोविंदराव भगवंत यांचे लिहिण्यांत आलें की 'इंग्रज प्रकणीं नवाबाचे थैलीपत्र श्रीमंतास आलें. त्यांत सर्व साधनें इंग्रजाचे कल्गांची. तेव्हां सरकारांत राजश्री पाटीलबावासहित विचार जाला या प्रमाणेंच नवाबांनी मान्य करावे.' त्याजवरून मुषीरुलमुलुक यांसी बोलण्यांत येऊन भवति न भवति जाली. आणि त्यांनीं ल्याहावयास सांगितलें त्या अन्वयें राजश्री गोविंदराव यांस जाब लिा आहे. सेवेंत विनंनि करतील ते ध्यानांत येऊन उत्तराविषयीं आज्ञा जाली पाहिजे. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries