Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
पौष व. ६ बुधवार शके १७१५ ता. २२ जानेवारी १७९५.

मामुली अखबार छ १३ माहे जाखार गुरुवार ते ता। १८ रोज मंगळवार पावेतों.
++ ++ ता १६ रोज रविवारीं............मुसारेहमुपासीं येक फरासीस नवा नौकरीचे उमेदवारीनें आला. त्याची मुलाजमत नजर जाली. जनवाड्याचा नक्षा दौलांनी दाखऊन जागा पाहून आले त्याचा बयान केला. साहा घटिकेस बरखास जालें. रारा ता छ १९ जाखर हे विज्ञापना.
छ २० जाखरीं डाकेवर.

श्री.
पौष वा ७ गुरुवार शके १७१५ ता. २३ जानेवारी १७९४.

श्रीमंत रावसाहेब यांस मामुली हवाल्याचें पत्र.
विनंती विज्ञापना. मौजे कमठाण्याहुन कुच नवाबानीं छ, १९ माहे नाखर बुधवारीं पाव घटिकां प्रथम दिवसां केलें, अंबारीमध्ये हाथीवर सवार जाले. खवांसीमधें दौला व मीरआलम उभयतां होते. तमाम फौज बराबर होती. सवा प्रहर दिवसां किले बेदरचे हवेलीस नवाब दाखल जाले, पांच सात मुकाम येथें होण्याचा बेत आहे. पुढें जनवाड्यास जाऊन राहावयाचा बेत निश्चय जाला. कुल असबाब डेरे वगैरे जनवाड्यावर उभा राहिला आहे. मागाहुन विनंती लिहिण्यांत येईल रा। छ.२० जाखर हे विज्ञापना.