Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
पौष शु. ९ शके १७१५ शक्रवार ता. १० जानेवारी १७९४.
विनंति विज्ञापना, दौलाचे बोलण्यांत आलें कीं ‘अजिमुदौला कोठें गेला याचा शोध कोठेंही लागत नाहीं. इंग्रजाचे मकाणास गेला ह्मणावा तर ममइ व सुरत या दों ठिकाणचीं वर्तमानें तहकीक आली. अजिमुदीला तेथें नाहीं. तेव्हां कोणे ठिकाणीं गेला. मोठे ताजुब आहे. याचा शोघ येथुनही होत आहे. व श्रीमंताचे सरकारांतूनही शोधं व्हावा. ' ह्मणोन बोलण्यात आलें. रा। छ, ७ माहे जाखर हे विज्ञापना.
श्री.
पौष शु. ९ शके १७१५ शुक्रवार ता. १० जानेवारी १७९४.
विनंति विज्ञापना. येथील साहुका-यांत दोन घटका रात्रीं चालीस पंचेतालीस मनुष्यें येऊन जमनादास व मोतीराम दुकानें दोन लुटुन वित्त विषय घेऊन गेले. त्या दिवसापासून शंभुनाथ ब्रजलाल, व बखतामल हुलासराये, व मनुलाल अपचलराये हे तीन दुकानदार मातबर, वरकड लहानमोठे सर्व हवालदील जाले आहेत. दुकानें आटोपून व्यवहार बंद. या प्रा। तूर्त जालें आहे. चोरीचें बंदोबस्ताकरितां किल्यांत साहूका-यापासीं कांहीं पाहाव्याचे जवानहीं दिल्हे आहेत. परंतु साहुकार लोकांस कोणे गोष्टीचा भरंवसा वाटत नाही, असा प्रकार जाला आहे. रा छ. ७ जाखर हे विज्ञापना.