मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
पौष व. २ शनिवार शके १७१५ ता. १८ जानेवारी १७९४.

छ. १५ जाखरी डांकेवर.
श्रीमंत राव सो यांस हवाल्याचें पत्र.

श्री.
पौष व. २ शनिवार शके १७१५ ता. १८ जानेवारी १७९४.

विनंति विज्ञापना. नवाब कमठाण्यावर राहिल्यास कमकसर दोन महिने होत आले. सैर शिकार जाली. सांप्रत येथून कुच करून मौजे बोरोंची व मौजे पापाड पा। हसनाबाद बेदराहून आठ कोस व कमठाण्याहून बारा कोस येथें जाण्याचा बेत ठरला आहे. दोन्हींही गांव वंजरातीरीं आहेत. तेथून संगारडी पंधरा कोस, सदाशिव पेंठ सतरा कोस आहे. बोरोंची व पापाड येथील जागा पाहण्याकरितां लछीराम व हरका-याचा नाईक व हरका-याच्या जोड्या याप्रा पा होते. जागा पाहून आले. नक्षा दौलास आणोन दाखविला. कमठाण्याहून कुच होण्याची तारीख छ. १७ व छ, २२ जाखर दोन आहेत. यांतून कोणे तारखेस कुच करणार त्याप्रा। वर्तमानाची विनंति मागाहून लिहिण्यांत येईल, येथून निघोन जनवाडा तीन कोसांवर, येथें मुक्काम होऊन तेथून पांपाडास जाणार. पांपाड हा रुख हैद्रराबादचा आहे. पांपाडाहून आग्नेय दिशेस हैदराबाद आहे. बेदर आठ कोस पाठीमागें राहिलें. तेथून षिकार करीत कोठें कोठें फिरतात हें पहावें. रा छ, १५ जाखर हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries