मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
पोष व. २ शनिवार शके १७१५ ता. १८ जानेवारी १७९३.

विनंति विज्ञापना. दौलांकडे छ, १३ जाखर गुरुवारीं अस्तमानीं आह्मी गेलों. नव खरीदीचे घोडे वमा दवाना परंडे वगैरे जवळ तालुक्यांतून आल्या त्या पाहात होते. असदअलीखान वगैरे जवळ होते. ताळभुपाल येथील पठाण नौकर यांचे सरकारांत राहिले आहेत, त्यांनीं नजरा केल्या. त्यानंतर चोबी बंगल्या पुढील सायवानामधें बैठक जाली, मीरआलम यांस बोलाऊं पाठविलें. तेही आले. येथून कुच होऊन मौजे पांपाड व बोरोंवी या जाग्यास नवाब जाणार हेंही दौलाचे बोलण्यांत आलें. तेथील नक्षा आला तो दौलांनी दाखविला, बेदराहून ईशान्य कोनास पांपाड बोरोंची वंजरातीरीं आहेत. तेथून संगारडी पेठ पंधरा कोसावर आहे. या प्रा बोलण्यात आलें. रा छ, १५ माहे जा।खर हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries