Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
पौष शु. ४ रविवार शके १७१५ ता. ५ जानेवारी १७९४.

विनंती विज्ञापना. येथील साहुकार मंडळी बेदरचे किल्याआंत हुकमाच. मोजीब छपरबंदी करुन दुकानें घालून राहिले. त्यास छ, ३० जावल शुक्रवारी दोन घटका प्रथम रात्रीचे समईं येकायेकीं फतेदवाड्याकडुन पस्तीस चालीस मनुष्य हत्यारबंद साता आठाचे हातांत बलम, व सात आठ तरवारी नागव्या धरून, व पांच सातजणाचे वोंठांत धोंडे, पांच साताचे हातीं कांठ्या, येकदोन पटेकरी, व तिघे टेंभे मोठे लाऊन, यात्रा प्रथम मल्हार नाइकाचे दुकानापासीं आले. त्या दुकानास साठी लाऊन येक माणुस उभा होता. त्यानें चोर असें ह्मणतांच त्यास कांठीं घालुन बसविला. पुढें नन्हुमल याचे दुकानीं माणुस होता. तोही दगडानें जाया दोन घटिका प्रथम दिवसां नवाब जनान्याचे बंदोबस्तानसीं स्वार होऊन शिकारीस गेले. येक हरणाची शिकार करुन दोन प्रहराचे अमलांत डेप्यास आले. फौजदारखानाचा माणुस उसाचे मळ्यांत जाऊन ऊंस मोंडले. गांवकरी यांनी त्यांस धरुन देषढीवर आणिलें. त्या माणसास बरतरफ करावयाचा हुकुम जाला. रात्रीं अपार घटिकेस खिलवतीमधें नवाब बरामद जाले, सरबुलदंजंग व घांसीमिया व हिसामुदौला वगैरे इसमांचा सलाम जाला. सहा घटिकेस बरखास जालें. छ. २६ रोज सोमवारीं प्रातःकालीं नबाब जनान्यासुधां शिकारीस निघोन पगाकाळे यांस हुकुम बाड्याबाहेर शिकारीचा, त्याप्रा तेही बाहेर हजर जाले, दोन हरणांची शिकार करून दीड प्रहरास डे-यास आले. रघोत्तमराव यांनी पुण्याहुन सोळा उंट बंदुखी पाठविल्या त्या गुजरल्या. रात्रीं दौलाची अर्जी व हिंदुस्थानची अखबार गुजरली. छ. २७ रोज मंगळवारी दोन घटिकां दिवसां नबाब जनान्यासहित स्वार होऊन शिकारीस गेले. दोन प्रहरास डे-यास आले. रात्रीं दैलाची अर्जी गुजरली. च्यार घटकेस खिलवतीमधें नवाब बरामद जाले, सरबुलंदजंग व घासीमियां वगैरे इसमांचा सलाम जाला. येक प्रहरीस बरखास जाले. छ. २८ रोज बुधवारी दोन घटिकां दिवसां नवाब स्वार होऊन शिकारीस गेले. चित्ते सोडुन दोन हरणांची शिकार केली. दोन प्रहराचे अमलांत डे-यास आले. सिदी अबदुला यांजकडे गंजीकोव्यास तीनसें स्वार रवाना जाले. रात्री खैरसला. छ. २९ रोज गुरुवारीं दोन घटिका प्रथम दिवसां नवाब स्वार होऊन आंबराईमधें गेले. तेथें भोजन जालें. दोन प्रहरास डे-यास आले. रात्रीं दोन घटिकेस नवाब बंदोबस्तानें दौलाचेथें आले. दौला व मीर आलम व पगावाले व मुनपी व रायेरीया यांचा सलाम जाला. दिवाणखान्यामध्यें बरामद जाले. अजमखान पागावाले याचा भाऊ कमरुसाहेब ह्मणोन होता त्याचा वाका जाला. सबब मातमपुरसी अजमखान यास च्यार पारचे करचोबी दिल्हे. दौला व मीर आलम यांसी खिलवत होऊन साहा घटिकेस बरखास जालें, रात्रीं लस्करांत चोरीने जोरावरजंग याचे घोड्याचा कंडापटा वे दिलदारखानाचेथील दुषाला गेली. अर्ज जाला. छ. ३० रोज शुक्रवारी दोन घटिकां दिवसां नवाब बंदोबस्तानें शिकारीस गेले. परिंदाची शिकार करून दीड प्रहरास माघारे आले. माहबतजंग याची अर्जी व दोन बंदग्या दालिबें गुजरलीं. दौलांनी मालेगावींहुन उंट व सवदागरी आणिले ते पाहिले. रात्रीं दोन घटिकेस नवाब दौलाचेथें आले. दौला व मीर आलम व पागावाले वगैरे लोकांचा सलाम जाला. दौला व मीर आलम यांसीं खिलवत जाली. साहुका-यांत किले बेदर येथें दरवडा पडोन जमनादास व मोतीराम यांची मालियत गेली, याचा अर्ज जाला, येक प्रहरास नवाब आपले मकानास गेले. छ. १ जाखर मंदवारी दोन घटिकां दिवसां नवाब स्वार होऊन शिकारीस गेले. पागावाले यांनीं बाडाबाहेर शिकार करून येक लांडगा धरून गुजराणिला. दोनप्रहराचे अमलांत डे-यास आले. औरंगाबाद येथील सुभेदाराची अर्जी व दालिंबे आलीं तीं गुजरलीं. र॥ छ. २ माहे जाखर हे विज्ञापना.
छ, ७ जाखरीं डांकेवर.