Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
पौष शु. ४ रविवार शके १७१५ ता. ५ जानेवारी १७९४.

विनंति विज्ञापना. दौलाचे बोलण्यांत आलें 'कीं टिपूनें मीरकमरुदीखां व महमद वजीरखां व आणिक येक मातबर गृहस्त या तिघांस कैद केलें. हें एक वर्तमान. व दुसरें कलिकोट-प्रांती मापिलें ह्मणोन जमीनदार मुफसद भारी जमिपतेचे आहेत. त्याजवर टिपूनें दोन कुशून पर्यदल बार व दोन रिसाले तंबीकरितां रवाना केले होते. त्यास मापिल्यांनी दोन कुशुन व दोन रिसाले टिपुकडील लढाई करून गारत केले. हें वर्तमान टिपुस समजल्यावर खुद जातीनें मापल्यावर जाण्याचा इरादा केला आहे. याप्रा। वर्तमान आहे, ह्मणोन बोलले. रा छ.२ माहे जाखिर हे विज्ञापना.