Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
पौष शु. ४ रविवार शके १७१५ ता. ५ जानेवारी १७९४.

विनंती विज्ञापना, मिस्तर किनवी दिलावरजंग यांस नवाबनीं रुस्वसत छ. २३ जावलीं दिल्ही. इत्यादिक वर्तमानाची विनंती पेशजी लिहिल्यावरुन ध्यानांत आलें असेल. किनवीनें दौला व मीर आलम यांचा निरोप घेऊन छ २४ रोजी तीन प्रहर दिवसां लस्करांतुन निघोन मंगळवारपेठ येथें त्यांस जागा नवाबांनी दिल्ही तेथें येऊन भोजन केलें. इष्टवट व आणीक दोघे सोबती त्यांस येथे ठेविलें. किनव स्वार होऊन छ मारीं सदासिव पेंठेच्या मुकामास गेला. हैदराबादपर्यंत रथ, घोडे, पालखी, म्याना, हाथी यांची डांक बसविली. हैदराबादेस छ, २५ रोजीं पोंहचावयाचा होता. तेथुन चिनापटणीस जाणार. चेनापटणाहुन विलायतीस जाण्याचा बेत जाला. किनवीचे मुबादला दुसरा येणार, तो अद्याप येथें आला नाहीं. तुर्त इष्ट्वट आहे. तो आल्यानंतर मागाहुन विनंती लिहिण्यांत येईल. रा। छ २ महे जा खर हे विज्ञापना.