मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
पौष शु. ४ रविवार शके १७१५ ता. ५ जानेवारी १७९४.

विनंती विज्ञापना. असद अलिखान यांनीं मालेगांवचे यात्रेंतून घोडे खरीद करून आणिले ते दौला पाहात असतां ‘घोडे किती खरीद केले' ह्मणोन मीं विचारलें. दौलांनीं वोलण्यांत आणिलें कीं, ‘असदअलीखान मुजफरुलमुलिक यांची जामियत पांच हजारांची सुलमानषाहासाहेब जादे यांचे पागा रिसाल्यापैकीं हाजुरजचे हुकमाप्रा. पैकीं चार हजार वार घोडा याजपासी. हजार बाकी. येक हजाराची भरती व्हावयाची. त्यास चार हजार जमावांत कुलसिदर समशेर असे लोक आहेत. करोल बिलकुल नाहींत. याजकरितां येक हजार करोलाची जमियत करण्याचा ईर्षाद. हजार घोडीं खरीद व्हावयाचीं. पैकीं मालेगांवचें यात्रेंत यांनीं तीनसें घोडे पंच्यायेसी हजारांस खरीद करून आणले. आणिकही यैवज जेथें घोडीं खरीद मिळतात तेथें पाठविला. मग खरीद होऊन काय येतात पाहावें, याप्रा। बोलले. रा। छ. २ जाखिर हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries