Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
मार्गशिर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २१ दिसेंबर १७९३.

विज्ञापना यैसीजे. येथील वर्तमान ता छ. १५ माहे जावल शुक्रवार पावेतों अखबार पत्रीं लेखन करून सेवेसीं पत्राची खानगी केली त्यावरून ध्यानास आलें असेल. तदनंतर येथील वर्तमान. छ. १६ रोज शुक्रवारीं प्रातःकालीं सरबुलंदजंग व दिलदारखान पुढें चिते घेंऊन सिकारीस गेलें. दोन घटिकां दिवसां जनान्यासहित बाड्यातआंत मौजें चिटपालाकडें गेलें. दीड प्रहरास माघारें आले. पागावाल्यांनीं वीस हरणांची शिकार करून गुजराणिली. दोन घटिकां दिवस शेष राहतां नवाब बरामद जालं पागावाले यांचा सलाम शिकारीच्या नजरा जाल्या. रात्रौ दौलाची अर्जी गुजरली. छ. १७ रोज मंदवारी प्रात:कालीं पागावाले हुकुमा प्रों बाड्याबाहेर शिकारीस गेले. नवाब दोन घटिका दिवसां स्वार होऊन जनान्यासुधां सैर करावयास गेले. येक प्रहर पांच घटिकेस डे-यास आले. पागावाल्यांनी नऊ हरणांची शिकार करून गुजराणिली. रात्री खैरसला. दौलाचे तबियतीचें वर्तमान आणविलें. छ. १८ रोज रविवारीं दोन घटिकां दिवसां नवाब शिकारीस बाडयाबाहेर गेले. पागावाले वगैरे लोकांचा सलाम जाला. शिकार करून येक प्रहर पांच घटिकेस डे-यास आले. रात्रीं साहा घटिकेस खिलवतीमध्यें नबाब बरामद जाले. सरबुलदजंग व घांसीमियां व अजमखां वगैरे इसमांचा सलाम जाला. पागावाल्यासीं बोलणें जालें. येक प्रहर दोन घटिकेस बरखास्त जालें. छ १९, रोजी सोमवारी दोन घटिका दिवसांनंतर नवाब सवार होऊन जनान्यासहित बाड्याआंत चिटपालास गेले. तेथें भोजन जालें. येक प्रहर साहा घटिकेस डे-यास आले. पागवाल्यांनी येक ससें व तीन डुकरांची शिकार करून गुजराणिली. डुकरें मिस्तर किनबीकडे पाठविलीं. रात्रीं दौलाची अर्जी -गुजरली. छ. २० रोज मंगळवारी दोन घटिकां दिवसां नवाब सवार होऊन जनान्यासहित शिकारीस गेले. दीड प्रहराचे अमलांत फिरोन डे-यास आले. दौलांनी आरोग्यस्नान केल्याचा अर्ज जाला. नवाबांनीं सथका पंचवीस बकरीं उडीद, तेल व खाना व खुर्दा याप्रों केला. दौलांनीं नजर पाठविली ती गुजरली, मिस्तर किनवी यांनी आपला असबाब हैदराबादेकडे रवाना केला. मालेगांवचे यात्रेहून पन्नास घोडीं किनवीनें खरीद करुन आणविलीं तीं आली. पागवाल्यांनिशी करार करून गुजराणिलीं. तीन प्रहरास असदअलीखान मालेगांवचे यात्रेहून तीनसे आठ घोडे खरीदी करून आणिले याचा अर्ज जाला. रात्रीं दौलाचीं अर्जी गुजरली. छ. २१ रोज बुधवारीं दोन घटिकां दिवसां नवाब जनान्यासहित स्वार होऊन गेले. आंबराईत भोजन करून येक प्रहर तीन घटिकेस डे-यास आले. तीन प्रहरास खाबगामध्यें बरामद होऊन लालन होज्यामाची याद केली. तो हजर जाला. हज्यामत करविली. च्यार घटिकां दिवस बाकी राहातां बरखास्त जालें. रात्रीं दोन घटकेस नवाब दौलाचेथें आले. दौला व मीर आलम व असदअलीखां व रायेरायां यांचा सलाम नजरां जाल्या. दौलांसी बोलणें होऊन येक प्रहराचे अमलांत नबाब आपले मकानास गेले. रा। छ. २४ जावल है विज्ञापना.