Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

दोन हरिणाची शिकार करूनं पा, ते गुजरली. दोन प्रहर पांच घटिकेस नवाब डे-यास आलें. दौला मैलाराहुन आले, त्यांचा अर्ज जाला. रात्रीं खैर सला. छ २७ रोज सोमवारीं दोन घटिकां दिवसां नवाब जनान्यासहित स्वार होऊन शिकारीस गेले. येक प्रहर च्यार घटिकेस माघारे आले. रात्री खैर सला. छ २८ रोज मंगळवारीं प्रातःकाळीं दौला स्वार होऊन शिकारीस पुढें गेले. तीन घटिकेस नवाब गदीचे हाथीवर स्वार जाले. शिकारीस गेले. पागावाले यांणी येक हारणाची शिकार केली. दौलांनी च्यार हारणांची शिकार करुन गुजराणली. असदअलीखानानीं परिंदाची शिकार केली. नवाबाची अंगठी गमावली, ते खिजमतगारास सांपडली त्यानें आणुन दिल्ही. त्यास इनाम दिल्हा. येक प्रहर पांच घटिकेस डे-यास आले. दौलांस व पागावाले यांस हुकुम जाला जे वाड्याबाहेर शिकारीस जात जावे. रात्रीं खैर सला, छ २९ रोज बुधवारीं दोन घटिका दिवसां नवाब जनान्यासहित स्वार होऊन शिकारीस गेले. दौला व असदलीखान व रावरंभा शिकारीस परभारां गेलें. पागवाले अलाहिदा गेले. नवाबांनी दोन हारणांची शिकार केली. दिलदारखानानें पांच हारणांची शिकार करुन गुजराणली. दौलांनी येक हरण धरलें. दोन प्रहराचे अमलांत नवाब डे-यास आले. हैदराबादेहून नव तोफा दाहा दाहा सेर गोळ्यांच्या आल्या व वीस शेर गोळ्याच्या तोफा ४. च्यार पेटारे बारूत गोळ्याचे. सदरहु सरंजाम बेदरचे किल्यांत दाखल जाला. छ माहे जावल गुरुवारी प्रातःकाली जनान्यासहित नबाव वार होऊन शिकारीस गेले. दौला व पागावाले व सलाबतखान बाडाबाहेर शिकारीस गेले. नवाबांनीं तीन हरणांची सिकार करून डबापुरास गेले. तेथील उंसांचे गु-हाळ तयार जालें, जनान्यासुधां उसाचा रस घेतला. भोजन जालें. दोन प्रहरास डे-यास आले. रात्रीं खैर सला. रा। छ ४ जमादिलावल हे विज्ञापना.