Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
कार्तिक बा ९ शके १७१५. बुधवार ता• २७ दिसेबंर १७९३.
विनंती विज्ञापना. कामठाणें येयें शिकारगाहाकरितां जाण्याची तयारी नवाबांनीं केली. जागा पाहाण्या करितां दौला छ १५ राखरी गेले होते. मैदान धरून वाढा मोठा दिला. कमठाण्यांत लोकाचीं घरें होतीं तीं तमाम खाली करविली. दोन तीन हवेल्याही आहेत. त्या येक नवाबाकडे; येक दौलानीं आपल्यास, योजून ठेविल्या. कामाठी, बेलदार, मजुरदार लाऊन जाग्याची मरमत करविली. जागीरदार, मनसबदार, मुतसदी सरदार सर्वास ताकीद कीं कोणीं बेदरांत न राहातां आपलाले संरजामसुधां कमठाण्यावर येऊन राहावें, झडे नेऊन उभे करविले. नवाबाचे खैम व चोबी बंगला जाऊन उभा राहिला बरकडही लोकांचे डेरे, राहोय्या, पाले संरजाम कमठाण्यास गेला, वरचेवर जात आहे. वाड्याचे रखवालीस गाडद मुसारेहमु, व सैदउमरखां व अबदुकरीम कुमदान वगैरेस हुकुम पोहचला. चराईस आसपास हाथी व उंट व बैल होते ते आणविले. काहीं आले व येतात. सरदारजागीरदारासही हुकुम असाच कीं आपलाले स्वार जेथें असतील तेथुन आणून जमा करावे. स्वारगाड्याची मोजदादही कमठाण्यावर पाहावयाचा बेत आहे. याउपरी नबाब निघोन डेरे दाखल होणार. याची तपसीलें विनंती लिहिण्यात येईल. रा छ, २२. राखर हे विज्ञापना.