Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
विनंती विज्ञापना, यैसीजे. येथील वर्तमान ता छ. १५ माहे राखर
बुधवार पावेतौं अखबार पत्रीं लेखन करून सेवेसीं पत्राची रवानगी केली, त्यावरून ध्यानास आलें असेंल. सांप्रत येथील वर्तमान छ मारी दौला कमठाण्यास जाऊन जागा पाहिली. तेथील लोकांचीं घरें खालीं करून मरामतीस बेलदार व कामाठी लाविले. येते समंई पांच हरणांची शिकार करून तीन प्रहराचे अमलांत किले बेदरास आले. नबाबास तीन दस्त जाले. रात्रीं दौलाची अर्जी गुजरली. छ. १६ रोज गुरुवारीं तमाम सरदार व मनसबदार मुतसदी यांजकडे चोपदार पाठऊन ताकीद केली कीं, ‘ कमठाण्यास आपलाले डेरे दांडे पाठऊन मिसलबंदीनें उतरणें,' प्रात:कालापासोन दोन प्रहर पर्येत नवाबास पांच दस्त जाले.चराईहुन पंचवीस हाथी व शंभर उंटें आले. दिवसां दरबार नाहीं. रात्रीं दौलाची अर्जी गुजरली. छ १७ रोज शुक्रवारीं हैदराबादेहुन अलीज्याह-बाहादुर -साहेबजादे यांची अर्जी व नजर व मिठाई आली ती गुजरली. महमदपन्हा दारोगा हरका-याचा यास हुकुम जाला कीं 'कमठाण्यास जाऊन सरकारी व तमाम सरदार म ( न ) सबदाराचे झेंडे उभे करणे.' त्या प्रा झेंडे घेऊन तो गेला. येक प्रहर दिवसां खिलवतीमध्यें नवाब बरामद जाले. सरबुलंदजंग व अजमखां व यकरामुदौला वगैरे इसमांचा सलाम जाला. येक प्रहर दोन घटिकेस बरखास जाले. रात्रीं जनान्याचा बंदोबस्त होऊन कंचन्यांचा नाच होता.छ १ ८रोज मंदवारीं मुसारेहमुकडील गाडद हजार आली. याचा अर्ज जाला. दिवसां दरबार नाहीं. रात्रीं दौलाची अर्जी गुजरली. छ १९ रोज रविवारीं फरेदुज्याह साहेबजादे यांनीं आपलीं सालगिरे जाल्याची नजर केली. मीर पोलादअली व सुभानअली यांची याद केल्या प्रा ते हजर जाले. त्यांस जनान्यांत बोलाऊन घेतलें, शुतरखाना शंभर उंट व च्यारसे बैत रथगाडयायाचे आले.दिवसां दरबार जाला नाहीं.दोन घटिकादिवस शेष असतां चराईहून पंचवीस हाथी आले. छ २० रोज सोमवारी दौलांकडे हुकुम गेला कीं रावजीस व मिस्तर किनवीस घेऊन येणें. साहा घटिका प्रथम दिवसां खिलवतीमधें नवाब बरामद जाले, दौला व मीरआलाम व सरबुलंदजंग व घासीमियां व अजमखान वगैरे मामुली इसमांचा सलाम जाला, रावजीची याद केल्याप्रा.ते आले. त्यांचाही सलाम जाला. दौला व रावजी व मीर आलम तिघांसीं खिलवत जाली. त्यानंतर मिस्तर किनवी व इष्टवट लपटन इंग्रजाकडील वकील आले. त्यासुधां बोलणें होऊन यक प्रहर च्यार घटिकेस किनवीस वाटे लाविलें.त्या नंतर यक घटिका निषस्त होऊन येक प्रहर पांच घटिकेस बरखास जालें. रा छ २२ राखर हे विज्ञापना.
छ २३ गुरुवारीं टपा रवाना पुण्यास.