Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
कार्तिक वा ९ शके ७१५. बुधवार ता० २७ दिसेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. टिपुसुलतान यांस दौलांनी आपलें तरफेनें पत्र तयार केलें, त्याचा मसविदा नवाबास मी समीप असतां वाचून दाखविला. त्यांत मारकीं, “ तिसरे किस्तीचा यैवज तुह्मीं कडप्यास पाटविला, तो घेऊन अ. ह्याकडील फलाणा शक्ष कडप्यांत होता. त्याजपासीं रसीद यैवजाची आमीं पाठविली, ते त्यानें दिल्ही. आपल्यापासी येऊन पोहोंचलें. दुसरे बल्हारी, उमरगोड, तलालकोटा व सिंगणमला वगैरे तालुक्यांतील कितेक गांव आपले तशरुफांत आहेत, ते इकडील अमीलाकडे वागुजास्त करावयाची ताकीद आपलें तालुकदारास निक्षुन यावीं की, हरगीज खलाल न राहे. या अन्वयें पत्राचा मा नबाबांनीं पाहुन बेहतर आहे यैसे सांगितलें, रा। छ. २२ माहे रावर हे विज्ञापना.