Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
कार्तिक वा ९ शके १७१५. बुधवार ता. २७ दिसेबंर १७९३.
विनंती विज्ञापना, नबाबाची शरिर प्रकृती हैदराबादेंत होती त्याहून बेदरात आल्यानंतर कृशत्व अधिक. आलीकडे तर बहुतच क्षीण शरीर आहे. माकुवत, त्यांतून पांच सात दिवसां पासोन दस्तही दोन तीन होतात. या प्र प्रकृतीचा अहवाल आहे. रा छ, २२ रा।खर हे विज्ञापना.
श्री.
कार्तिक वा ९ बुधवार शके १७९५ ता० २७ दिसेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. ईसामियांकडील पहिलें तालुके ताडपत्री, ततबारी, सिंगणमला, येलानुर हे च्यार तगीर करून दिलावरुदौला गंजीकोव्याचा किले दार याजकडे सांगितलें. ईसामियां यांस हैदराबादचे सुभ्याचे तालुके नलगुंडा, देवरकुंडा व कोलीपाला वगैरे भवनगिरि सरकारसुद्धां सांगोन ईसामियां यांची रवानगी केली. छ. १९ राखरीं ईसामियां गेले. ईसामियां यांनीं टिपुस । कमरुदीखानास पत्रें लिहिलीं होतीं त्याचे जबाब सांपडले. दौलांनीं आह्मांस दाखविलें. याचा तपसील व पत्राच्या नकला पेशजी सेंवेसीं पाठविल्या. त्यास ईसामियां यांचें बोलणें दौलांसीं कीं “ हीं पत्रें खोटीं; याची तहकीक करावी. " दौलानीं तहकीक करितां पत्रें खरीं नाहींत. ईसामियांचा पहिला कारकुन व्यंकटराव बरतरफ केला. त्यानें अदावतीनें दरम्यान तुफान रचून पत्रें तयार केलीं. हीं खोटीं यैसें दौलांस समजलें. रा छ, २२ राखर हे विज्ञापना.