Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
कार्तिक वा ९ शके १७१५. बुधवार ता० २७ दिसेबंर १७९३.

विनंती विज्ञापना. लाड बाहादुर व मिस्तर सरज्यान, षोर यांची दोन तीन पत्रें नवाबास थैल्या आल्या. त्या मिस्तर किनवी दिलावरजंग यांनीं नवाबास आह्मीं जवळ असतां गुजराणिल्या. पत्रें खोलून वाचून पाहिलीं. लाड बाहादुर यांचे पत्रांत मारकीं, “ मी कलकत्याहून जाहाजांत स्वार होऊन विलायेतीकडे गेलो. त्या मजवर आपली ममता व दोस्ती येखलास होती, त्याच बमोजीब दोस्तीचा सिलसिला मिस्तर सर ज्यान षोर गौरनर माझे जागीं आहेत, त्यांसी असावा." व ज्यान षोर याचे पत्रांतील मार कीं “ लाड बाहादुर कलकत्याहून निघोन जाहाजांत बसोन विलायेती कडे ( गेले?) गौरनरीचे अधिकारावर मी आहे. लाड बाहादुर यांसी दोस्ती व येगानगत आपली त्याहून ज्यादा तरकी असावी'' याप्रों दोघांकडील पत्रातील मार. राछ २२ राखरहे विज्ञापना.