Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
श्रीमंत राजश्री---------रावसाहेब स्वामीचे

सेवसीं----------------
विनंती सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक सा नमस्कार विनंती विज्ञापना ता २३ माहे राखर बेदर येथें स्वामीचें कृपावलोकानेंकरून सेवकाचें वर्तमान येथास्थित असे विशेष. इकडील वर्तमान पेशजी छ २२ माहे मजकुरीं लेखन करुन पत्राची रवानगी सेवेसीं केली त्यावरुन ध्यानांत आलें असेल. सांप्रत येथील वर्तमान छ मजकुरीं रोज गुरुवारीं प्रथम दोन घटिका दिवस आल्यानंतर नवाब जर्द अंबारींत स्वार जाले. खवासींत दौला व मीरआलम होते. वरकड साहेब जादे ज्यांस समागमें यावयाची आज्ञा जाली ते व आणिक अमीर उमराव तयार होऊन आले. व जनान्याचा रथ व गाड्या व अंबा-या वगैरे सरंजाम सिद्ध जाला. या समुदायानसीं कसबे कमठाणें पार मजकुर बेदरापासोन तीन कोसांचे फासल्यानें आहे, तेथें शिकारीचें मकान करार केलें आहे. स्वार होऊन गेले. कमठाणें याचे उत्तर व पूर्वभागीं गारद्याचा बाडा शिकारचे मैदान मध्यें सात कोस घेऊन बंदोबस्त करविला. याजमुळें बेदराहून लोकांस जाण्यास येका मार्गे नबाबाचे डे-यास पांच कोस व पश्चमेकडून व पूर्वेकडोन जाण्यास बारा कोस, याजकरितां सर्वलोक, सरदार, मुतसदी आदिकरून समागमें गेले ते किल्याचे दरवाज्यावर परवानगी आंत जाण्यास नाहीं. दौला यांचे सांगण्यांत कीं नबाब कमठाण्यास वीस दिवस राहणार. आणि सरंजाम महिन्याचा तेथें करविला आहे मग पाहावेंवीस दिवस राहतात किंवा महिना राहतात, नबाबाची प्रकृति या दिवसांत काहींसी बेआरामाची दिसण्यांत आली. परंतु जाहेरदारींत दाखविण्यात कटाक्ष दाखऊन आहेत. बेदरची हवा तो कोणासच मानत नाहीं. कमठाणें येथील हावा कसी आहे हें आतां पुढें समजेल त्या प्रो विनंती लिहिण्यांत येईल रा. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.
छ. ४ जमादिलावलीं पत्राची रवानगी डांकेवर.