Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
कार्तिक वा ९ शके १७१९. बुधवार ता० २७ दिसेबंर १७९३.
विनंती विज्ञापना, नवाबांनीं सरकारांत पारसी पत्र लिहिलें. त्याचे हिंदंवी तरजुम्यांत कांहीं शब्द संग्रहार्थाचे आहेत, त्याचा खुलासा अर्थ ध्यानात येण्याकरितां विनंती कीं:--
१ “या मसाविद्यांत" असा शब्द जागा जागा आहे. त्यास सरकारांतुन दाफातीचा मसविदा ठरून मालिटाकडून यांजकडे आला. तो मसविदा लाडाकडून साता दफेची याद आली, त्यासी यांनीं मुकाबिला करून कमज्याद निवडून काढिलें, त्याचा दाखला पुरण्याकरितां या मसविघांत एसा शब्द आलें “ “हामसविदा " ह्मणजे सरकारांतून ठरला तो.
१ " वंश परंपरा " याचे पुढें “ कायम मकाम येक दुस-याचे" हा शब्द आहे. याचा अर्थ असा कीं, येंक अधिकारी तगीर होऊन त्याचे कामावर दुसरा होणें, त्यास कायम मकाम असें ह्यणाचें. यांस दृष्टांत जसे लाड बहादुर जाऊन त्यांचे स्थलीं मिस्तर ज्यान षोर नवा जनराल आला या प्रमाणें.
१“पलटणें इंग्रजांची सरकारांत दरखांस्तीचें कलम” याजगी “हा जाबसाल इग्रंजासीं तालुक. अम्हांसी इलाका नाहीं." ऐसें यांनी लिहिलें. यांचें तात्पर्य कीं, हा तहनामा तीन सरकारासीं; व तिन्हीं सरकारांतुन परस्परें देणें घेणें तेंव्हा तीन सरकारास समान तसें कलम तहनाम्यांत असावें. पलटणाचे दरखास्तीचा प्रकार इंग्रजासीं. त्या अर्थी फक्त इंग्रजासींच तहनामा असता तर हें कलम नीट. तीन सरकारां मिळोन तहनामा होणें, यांत याचें प्रयोजन नाहीं. असा यांचे लिहिण्याचा खुलासा. रा छ २२ माहे राखर हे विज्ञापना.