Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

१ लाइबाहदुर यांचे मसविद्याची तिसरी दफा पहिले तहनाम्याचे दुसरे दफेचे मजबुतीकरितां आहे. ती या मसविद्यांत बिलकुल मवकुफ केली. त्यास हालीं हा तहनामा होणे. याची बुनियाद श्रीरंगपटनाचा तहनामा, त्या तहनाम्याचेः कायमी करितां हे दफा लाडानें ठराविल्या बमोजीब दाखल करणें जरूर.

१ या मसविद्याची तिसरी दफे यास व लाड बाहादुर यांचे चौथे दफेसीं अर्थ पाहातां नवल आहे. परंतु लाडाचे चौथे दफेंत षरीकांनीं जलदीनें ज्या शरीकास इजा पोंहचेल, त्याची इतला जाल्यावर तेच समंई खबर घ्यावी असा मजमुन आहे. तसा अर्थ या मसविद्याचे तिसरे दफेंत समजण्यांत येत नाहीं. बलकी विपरीत आहे. याज करितां लाडाचे चौथे दफेंची इबारत बाहाल ठेवणें जरूर.

१ या मसविद्याचे चौथे दफेंत लि आहे कीं वकील ठेवावा तो आपला व आपले खाविंदाचे चितांतील खुलासा जाहीर करीत जाईल इतकेंच लिहिलें आहे असें लिहिलें नाही कीं वकीलानें कोठें राहावे ? लाड बाहादुर यांचे पांचवें दफेत लि आहे कीं हरयेक सरकारचा वकील दुस-या सरकारचे फौजेंत राहून चित्तांतील खुलास व अहवाल जाहीर व्हावा, या करितां परवानगी असावी. तेव्हां । मजमुन लाड बाहादुर यांचा चांगला जाहीर आहे.

१ या मसविद्याचे पांचवे दफेंत अधिक लि आहे की घोड्याचे खरीदीची षुमारी पाहिजे. व शिपाई मनुष्याचे निगादास्तीचा शब्द कम केला. त्यास दिलावरजंग बहादुर यांचा ईजहार आहे कीं घोड्याचें मेज व अमुक वर्षाचे प्रमाण या प्रा मिळाल्यास कंपणीचे सरकारांत पसंद. त्यास अशा त-हेचीं घोडीं पसंदीचीं या मुलकांत कम. या बमग, षुमारीचे कैदेचे काय जरूर ? व सिपाई लोकांचे निगादाष्तीचा मार बाहाल ठेवणें, यांत तिन्हीं सरकारचा फायदा आहे यास्तव हा मजमुन बहरगीज मवकुक करूं नये.