Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
१ आठवे दफेंत येकदोन पलटणे. इंग्रजाचे सरकारांतुन दरखास्त करून लिहिलें. त्यास हा जाबसाल कंपणी इंग्रज यांचे सरकारासी तालुक आहे, आह्मांसी इलाक १ नाहीं.
१ या मसविद्याचे न (व) वे दफेंत लिहिलें आहे कीं टिपु कडुन जो मुलुक २ सुटेल त्यांत ब्राह्मण व फकीर व दरगाहा जे कांहीं ज्यारी असेल त्या प्रा तिघांनी ज्यारी ठेवावें. त्यास ह्या मजकुराच्या शर्ता तहनाम्यासी तालुक
काय ? हरयेक सरकारांनीं खैरात देण्याविषंई आपले घरचे मुखत्यार आहेत.
१ या मसविद्याचे दाहावे दफेंत मजमुन आहे कीं राव पंत प्रधान यांचे सरकारची पेषकश टिपु कडुन येणें ह्मणोन लि आहे. त्यास हे दफा कफाले. तीचे अहदनाम्यांतील नाहीं. बलकी, मोहिमेचे अहदनाम्यांतील आहे. त्यास अहद नाम्यांत लिहिणे मंजुर आहे. तरी आमचे सरकारची पेषकश कदीम पासोन सनदाचे रूईनें ४ वाजवी आहे. हेही दाखल करावी. परंतु, हे दफा केवळ या तहनाम्या विरुद्ध. या तहनाम्याची बुनियाद केवल सरंक्षणार्थः टिपुसुलतान यांचे पेषकदमीचा खलल दूर व्हावा या विषईची आहे. ती खराब होती. आणि सध्यांच मोहिम करणें लाजमे ५ होतें. यास्तव हे दफा काहाडणें जरूर फार जरूर.
१ अकरावे दफेंत दारुगोळा व बंदुखा व तोफा वगैरे सामान जंगी अगर सरकारांत मतलुब जाल्यास कंपणीचे सरकारांतुन बेपारी यांज पासोन बिला महसूल खरीदी करण्याची परवानगी असावी. त्यास दिलावरजंग बाहदुर यांचा ईझाहार यैसी आहे कीं,जंगी सामान विकावयाचें कंपणींचे सरकारांत मामुल नाहीं. तमाम बेपारी यांस मनाई आहे की कांहीं समान जंगी न विकावें गौरनर जनरल या विषंई ६ हुकुम सर्वास देऊं सकत नाहींत. व आमचे सरकारांत हा। सरंजाम घेण्याची बिलकुल जरूर नाहीं.अगर आं शाहामत मर्तबात यांस जरूर असल्यास मिस्तर मालिट बाहादुर यांसीं दिलावर जंग बहादुर यांनी जाहिर केल्याचें मरातब पडताळून पहावें जियादा अंयां ( य्या ) मबकान बाद
( ज्यास्त काय ? आपला काल सुखांत जावो. ) र॥ छ २२ राखर अर्बा तिसैन मया व अलफ.