Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
कार्तिक वा ९ शके १७१५. बुधवार ता० २७ दिसबंर १७९३.
* तरजुमा १ श्रीमंतास नबाबाचे पारसी पत्राचा.
आं शाहामत २ मर्तबातच्या तजवीजेचा ३ तहनामी मिस्तर मालिट बाहादुर यानीं पाठविला त्यास दोन महिने जाले, मिस्तर इष्टबॉरट ४ बाहादुर थांचे मारफातीनें हाजुरांत गुजरला. ताजूंब ५ आहे कीं हा काल पावेतों राव गोविंदराव कृष्ण यांचे मार्फतीनें हाजुरात मसविदा न पोंहचला. यैसियास दाहा महिनें तहनाग्याचा जाबसाल दोन्हीं सरकारांसीं दरपेषं. ६ इतकी मुदत गुजरल्या. नंतरही पाहणें जरूर. याजकरितां राव मजकुर याचे मारफातीनें मसविदा पोंहचण्याची इंतजारी ७ अधिक न करणें जाणुन हाल मसविदा तिकडुन ठरला यासीं व लाड बाहादुर यांचे तजविजीनें सात दफाचा ८ तहनामा ठरून आला, त्याचे शब्द व अर्थ यासीं मुकाबिला ९ करून पाहतां यांत कमज्यादा करण्याच्या कबाहंती १० खातरेंत गुजरल्या, त्याचा तपशील लिहिण्यांत येतो बि.?
१ या मसविद्यांत आपलाले दौलतीचे बंदोबस्ताचा शब्द लिहिला आहे. त्यास, या आहदनाम्यासी या शब्दाचा तालुक काय आहे ? श्रीरंगपटणचे आ हदनाम्याचे शर्तीची यांस हा शब्द व परस्परें वंशपरंपरा व कायम मकाम येक दुस-याचें. हा शब्द लिहिला नाहीं. हा शष्द असेल तसा दाखल करणें जरूर.
१ दफे अवल व दुसरी या मसविद्याची, त्यांत लाड बाहादुर याचे तज विजेचे दफातीसीं पाहातां शब्दाचा मात्र फेर परंतु, अर्थ येकच. याअर्थी लाडबाहादुर यानीं जसे शब्द लिहिले त्यांत तबादला कशाकरितां करावीं ?