Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद शु. १३ वुधशर शके १७१५.
विनंती विज्ञापनाः पागेकडील तालुकियाचाकारभार आठ दहा दिवस पर्येंत घोळाखालें पडून रोज येक नक्षा ठरावा याप्रा होत गेलें. येकंदर पागा तालुकियाचे दोन टुकडे तीस तीस लक्ष इजाफ्यासहित येक सरबुलंदजंग यांचे निसबतीस साहेब जादे व शमषुल उमरासुधां व येकांत अजमखान व घासीमियां; याप्रा वांटणी दौलाचे संमतें राज्याजीनीं ठरविली. इत्यादिक ता जें होत आलें त्याची विनंती पेशजी लिहिल्यावरून ध्यानांत आलें असेल. दोन वाटण्या याप्रा जाल्याचा विच्यार नवाबांनीं पाहून या करण्यांत तालुक्याचा बंदोबस्त खातरखा नाहीं. पुढेंही बखेडाच. समजोन नबाबांनीं अजमखान यांजकडे सांगोन पाठविलें कीं, “पागेकडील कामाचा कुल बंदोबस्त तुम्हांकडे सांगून सर अमीली सिदी इमाम यास दिल्ही. दरमियान व्यंकटराव सुरापुरकर यांनी त्याजवर इजाफा कबुल केला, त्यास तुम्ही सरकार नुकसानीचे रवादार कांहीं नाहीं. त्यापक्षीं इजाफा व्यंकटराव यांनीं केल्याप्रा तुम्हीच कबूल करून आपले कामाचा बंदोबस्त राखावा. अजमुल उमरा बहादुर यांची तुमचीही सफाई करून देववितों. त्यांनी तुम्ही येक विच्यारें राहून ज्यांत सरकार काम व उपयोग तें अमलांत आणावे. यांत आमची खुषी. आणी तुमचेही नोकरीस हेच लाजम आहे. अजमुल उमरा यांस तुम्ही षमषुल उमरा प्रा पाहात जावें.''यैसें सांगोंन पाठविल्यावरून अजम खान यांनीं अर्ज केला की “ जशी हाजुरची ईर्षाद त्याप्रा गुलाम हाजर आहे.” याप्रा इकडील बंदोबस्त आंतुन करून दौलासही। नवाबांनी सांगितलें कीं “पागेचे कामांत महमद अजीमखा यांचीच वकफियत चांगली.........यांचे हातें पागा तालुकियाचा बंदोबस्त ज्यारी राहावा तुम्ही त्या ........काम चांगलें तें करावें. अजमखान........(शमशु)ल उमरा याची नजर होती तसी तुमची असावी; व खान मार ही तुम्हास त्यांचे ठिकाणीं समजोन वागतील.” यात-हेनें दोंही कडील साधन पकें केलें. तों पावेतों राज्याजी आदि करुन कोणा येकास हे कांहींच समजों दिल्हें नाही. दौलांनीं राज्याजीस सांगीतलें की तुम्ही तीन फर्दा तयार कराव्या. येक फर्द कुल तालुकियाचे काम व्यकटराव याचें नाबें, दुसरी फर्द निमै सरबुलंदजंग व निमे महमद अजीमखां घासीमिया, हानक्षा, तिसरी फर्द अजमखान यांचे नावें कुल तालुकियाची, या प्रा तीन फर्दा तयार करून समागमें घेऊन यावें. यातून हाजरती ........ कलेल या प्रा सां ........ फर्दा घेऊन दौला व राज्याजी नबाबाकडे गेले. पागेवालेही सरबुलंदजंग घासीमिया व अजमखान दिलदारखान हे सर्व आले. अमील व्यंकटराव सिदी इमाम हेही हाजर जाले. प्रथम नबाबाचें बोलणें दौलासी दोन घटिका होऊन, राज्याजी यांच्या फर्दा पाहिल्या. कुल तालुकयाचा बंदोबस्त अजमखान याजकडे सागांवा हें नवाबाचें विच्यारास आलें, याचा रुकार दौलाचाही पडून अजमखान यास बोलाऊन नबाबांनीं खातरजमा करून सांगितलें. दौलाची व त्याची सफाइ करून. दिल्ही. अजमखान याचें जिमे पागा तालुकियाचा कुल कारभार केला हें व्यंकटराव यांस समजतांच, मार निलेनीं ये तेथेंच आधीं बासष्ट लाखाची येकंदर फर्द दिल्ही होती, त्याजवर आणिक इजाफा पांचलक्ष ........ (गु) जराणली. नबाबांनीं पाहून दौलास ........ नवाब बोलले कीं, फर्द त्यांचें त्यास माघारी द्यावी. त्या प्रा फर्द फिरोज व्यंकटराव यांचे यांस दिल्ही. बासष्ट लक्ष रु. व्यंटरावांनीं इजाफ्यासुधा केले होते; त्यां पैकीं च्यारलक्ष महकुफ करून अठावन लाखाचा अदाजा महंमद अजीमखां यांस करार करून दिल्हा. याशिवाय व्यंकटराव यांनीं नबाबाचे तोषेखान्यांत चार लक्ष रु. देण्याचा करार कैला होता, तोही अजमखान यास नवाबांनीं । माफ केला. याप्रा। अजमखान यांचीं पास खातर ठेऊन दौलाचें व त्यांचे रहस्य करून देऊन कारभार याप्रा उलगडला. रा छ, ११ माहे. सफर हे विज्ञापना.