Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
भाद्रपद शु. १० रविवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. पागेकडील तालुक्याच्या दोन टुकड्या नबाबांनीं ठराऊन वांटणी जाली. सरबुलंदजंगाकडे महमदअजीमखान यांजकडील तालुक्या पो कलबर्गे व चितापुर, अबजलपुर, मणुरमाषम, हुमणाबाद, बेंबली, हे वांटणीत गेले; व अजमखान यांजकडे सरबुलंदजंगाकडील हसनाबाद व हतमुरें, नारायेणखेड हे लागलें. घासीमियां यांजकडील देगळूर, सारबाड व खालखंदार, आदिकरून पहिले माहाल होते तेच बाहाल राहिले. त्यांपैकीं कांहीं गेला नाहीं, व त्यांस आला नाहीं. याप्रा दोन टुकड्यांत महालची वांटणी मध्यस्ताचे संमते, नबाबाचे हुकमा प्रा राज्याजी यांनीं केली. या उपरी सरबुलंदजंग व महंमद अजीमखां यांजकडून अमील ठरून आपलाले माहालीं रवाना होणार. येकंदर पागा तालुकियाचा आकार बतीस लाखाचा होता; त्याची बेरीज साठ लाखावर इजाफ्यासहीत कायम करून माहालाची वांटणी जाली. सरबुलंदजंगाकडून सर अमील व्यंकटराव सुरापुरकर व अजमखानाकडील सिदीइमाम व घासीमियांकडींल फदुलाखान व तिमाराव हरी याप्रा अमील रवाना होण्याचा बेत आहे. रा छ ८ माहे सफर हे विज्ञापना.