Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री
भाद्रपद शु. १० रविवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. मध्यस्तानीं आपल्याकडील रिसाल्याचें व पागेचे लोकांस सर्वीस ताकीद केली आहे कीं
“तुम्ही आपले सरंजामसहित तयार असावें खाविंदाचा हुकुम कोणे समई कसा होईल याचा कांही नेम नाही याजकरितां अगाऊ तुम्हांस इतला केली आहे. बेफाम न राहतां आपले जमियतीची सरंजामानसी तयारी करून सावध राहावे. हुकुम होतांच तेसमई तयारीचा जिकीर न राहतां हुशारीनें असावे.” याप्रा ताकीद केली. वरकडही अतराफ सिलेदार वगैरे लोकांस याचप्रा ताकीद आहे. नव निगादास्तीचे लोक मसादा घेऊन गेले. त्याप्रो कितेक आले; व येणार तेही वरचेवर जमा होत आहे. दाग चेहरे करून रोजमरे कितेकांचे ज्यारी जाले. शिवाय नवीन फुटकर लोक येतात, तेही ठेवितात, रा छ ८ माहे सफर हे विज्ञापना.