Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
भाद्रपद शु १३. बुधवार शके १७१५.

विनंती विज्ञापना, येथील तमाम मुतसदी व किरकोळी मनसबदार यांचे जागिरीवर पटी पांच लाख रुपयाची दौलांनीं ठराऊन सर्वांचे मागें चोपदार व सजावल राज्याजी भवानदास सेडमल आदिकरून देखील भारामल यांस लाऊन . निकड केली आहे कीं नजरेबाबत यैवज दाखल करणें, त्यांची रदबदल दौलासीं होत आहे. इतक्यावर यांचे काय ठरांवात येतें त्याप्रा मागाहून ता विनंती लिहिण्यांत येईल. दौलाचे कारकिर्दीपासोन मुतसदी यांनीं हजरी गणपतीचे कामांत तफावत ....... खो रुपयाचा....... मुतसदी मंडलीवर निघतो. या विषींचा तगादा लागल्यावरून कांहीं आलल हिसेबी नजरेचा ठराव व्हावा असें बोलणें लागलें आहे. कारण कीं, याची जुजरसी केली असतां कोठपावेतों करावी ? सबब नजरेवर ठरावें असें होत आहे. यावर जसें ठरेल त्याप्रा विनंती लिहीन. रा छ, ११ माहे संफर हे विज्ञापना.