Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद शु. १३ बुधवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. गंजीकोटा व कडपे तालुकियांत मुफसदाचा हंगाम भारी. कितेक ठाणीं जमीदार वगैरे मुफसद लोकांनीं नबाबाकडील व टिपुकडील घेतली. याजकारितां मुफसदाचे तंबीस टिपुकडीलही कांहीं जमियत व सरंजाम आला. यैसें वर्तमान आहे. यावरून नवाबांनीं आपले तालुक्याचे बंदोबस्ताकरितां येथून दिलावरुदौला किलेदार गंजीकोटा याजकडे मुसारेह मु ......... समागमें येक ........ व दे न तोफा व दाहा निशाणें गारद्याचीं व दाहा संदुखा बारुदचे याप्रा सरंजामानिसी रवानगी केली रा। छ, ११ माहे सफर हे विज्ञापना.