Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ६०७ ]

श्रीर्जयति

शक १६५३

राजश्री राणोजी सिंदे गोसावी यासि--

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। चिमणाजी बल्लाळ आशीर्वाद. सु॥ इसन्ने सलासैन मया अलफ. नंदलाल मंडलाई प्रा। इंदूर हे मृत्य पावले. त्यांचे पुत्र राजश्री मंडलाई तेजकर्ण कुवर न्याहालकर्ण हाली निष्ठेनें वर्ततात. त्यास, त्याचें अगत्य सर्व प्रकारें आहे. आणि ते जागा हरएकविसी आपली आहे. तेथें हरएकविसी रयात करून याचें चालवयाविसी रा। मल्हारजी होळकर यांस तुह्मांस पत्र लिहिलें आहे. तरी तुह्मी ते जागा आपलीसी जाणून सालगुदस्ताच खंडनीपैकी ५००० पांच हजार सोडून बाकी साल मजकुरी घेऊन सर्वप्रकारे चालविणें. येविसी रा। मल्हारबासही तुह्मास लिहिलें आहे. मशारनिले सर्वस्वे आपले मायेचे आहेत त्याचें आह्मास बहुत अगत्य आहे. तरी लक्ष प्रकारे लिहिणेंप्रमाणें चालवयासि अंतर न करणें, जाणिजे.