Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
याजवर मशारनिल्हे बोलिले, बोलण्यांत शपथपूर्वक आले, गोविंदराव माहित आहेत. तेव्हां त्यास ह्मटलें, करार न झाला तर नहो, नानानीं तुह्माशीं शपथ याविषयी केली आहे कीं काय ? तेव्हां बोलले, शपथपूर्वक करावें असें बोलणें आहे. बोलणें हें निराळें, दहा गोष्टी बोलण्यांत येत असतात, परंतु निश्चयें होऊन याप्रमाणें अमलांत आणावें याचे बोलणेची शपथ होत असते, तें पक्कें कसें झालें आहे किंवा कसें ? याजवर बोलले कीं, निश्चय याप्रमाणें करावें असें ठरलें, निश्चयांत तथा राहिली नाहीं, यादीवर करार एका दोहों दिवसांत व्हावा तो न झाला. याप्रमाणें त्यांचे बोलण्यांतील गर्भ ऐकून घेतला. मला बहुत संदेह पडला होता कीं, मुलका विषयीं सरकारचे वचन गुंतलें आहे कीं काय ? मशारनिल्हेनीं बयान करून सांगितलें याजवरून समजले जे बोलण्यांत गोष्टी आल्या असतील, परंतु दस्तऐवज अथवा वचन शपथ क्रिया अमल कलम असें झालें नाहीं. येथें त्रिवर्ग आले. नवाबाची कृपादृष्टि, अणि खुशामतीची गोष्ट, आणि दौलतखाही केली असें तर दाखविलें पाहिजे. ऐवज तर कांहीं नाहीं. तेव्हां काय करितात ? यास्तव नवाबापाशीं उजागरीनें बोलावयाकरितां हा मनसुबा केला कीं, आह्माशीं शपथपूर्वक मदारुल्लमहाम यांचे बोलणें झालें होतें, यादी ठरल्या, करार व्हावा, इतक्यांत गोविंदराव कृष्ण यांचें पत्र काय आलें न कळे, करार होणें तसाच राहिला, ह्मणून मजवर अदावत टाकिली. श्रीमंत लोकांचें वचन धरावें. वचन पाळणें न पाळणें हें थोरास उचित असेल ते करतील. आह्मीं त्या वचनाचे विश्वासावर आहों ह्मणून स्वामीचें व राजश्री नानाचें नांव घेऊन बोलतात. यातील वास्तव अर्थ पाहतां स्वामाचें वचन झालें, त्यास विरुद्ध घडलें नाहीं. मींही इष्ट. त्वांत अंतर केलें नसतां शुद्ध अदावतीसारखे मशीं चालतात. आणि स्वामीचे वचनास शब्द ठेवण्यासारखें दाखवितात. इतकें कारस्थान रंघोत्तमराव यांचें. राजाजीचे सल्लाहगार हेच आहेत. जसा हे वीर मरतात तशी ते वर्तणूक करितात. मुख्याचा प्रकार तर पिशाचे हातीं कोलीत तशी अवस्था आहे. स्वामीकडे दोष ठेवून बोलतात. याच्या गति काय होतील न कळे. जसें भविष्य तदनुसार बुद्धिं । काय असेल तें दृष्टीस पडेल. स्वामीचे ध्यानांत यावें ह्मणून वास्तव्य झालें तें लिहिलें आहे. र॥ छ २८ जिलकाद. हे विज्ञापना.