Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[२२२] श्री. २० आक्टोबर १७९५.
विनंति विज्ञापना. अलीजाहबहादूर रेणापूर, बरदापूर तालुकियांतून जमीयतसुद्धां धांरूरचे घाटास जाऊन घाट उतरून खालीं गेले, याप्रों। वर्तमान आलें. घाट उतरतेसमयीं रखवालीस नबाबाकडील किल्लेदाराचे लोक शेंपन्नास होते, त्याजवर तरवार चालली. तोडातोड करून लोक ठार जखमी झाले. घाट उतरून वीरप्रांतीं गेल्याचें वर्तमान. पुढें कोणाकडे जातात पहावें. मीरअल्लम इंग्रजी पलटणासहीत मुसारेमू वगैरे सरदारांत मिळोन वंजरा नदी पार झाले. अलीजाह याशीं व मुसारेमू वगैरेशीं तफावत तीस कोसांची आहे. वरदापूर, रेणापूर, आवसें, उदगीर, या तालुकियांत अलीजाह याचे फौजेची धुमधाम होऊन तालुका लुटून ताख्तताराज झाला. हल्लीं सरदारही त्याच मार्गें पिच्छा करून चालले. तालुक्यांत एक गांव लुटीशिवाय मोकळा राहिला नाहीं. याप्रों।।बोभाट जागीरदार व आमीलांचे नबाबाकडे रोज येत आहेत. या प्रों।। तूर्तचें वर्तमान. पुढें होईल त्याची विनंति लिहिण्यांत येईल. र।। छ ६ माहे र।।खर हे विज्ञापना.