Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[६२] श्री. १२ जुलै १७९५.
विनंति विज्ञापना. अलीज्याहा बहाद्दूर साहेबज्यादे आंदोल येथें होते. सदाशिव रड्डी जमीयत घेऊन दौंडेस जाऊन बेदरचा किल्ला घेतला. साहब ज्यादे याजकडे रड्डीकडून किल्ल्याची खबर आल्यानंतर खुषीच्या तोफांचे बार व साखर वाटली. लोकांच्या नजरा झाल्या. शिद्दीं अबदुलाही हस्तगत झाला. साहेब ज्यादे आंदोलाहून निघून बेदरास गेले. याप्रमाणें वर्तमान आहे. र।। छ २४ जिल्हेज. हे विज्ञापना.