Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[५९] श्रीव्यंकटेश प्रसन्न. २९ जून १७९५.
पारसी मोहर
राजश्री व्यंकटराव बापू स्वामीचे सेवेशीं.
विनंति उपरी. येथील कुशल छ ११ जिल्हेज जाणून स्वकीय लेखन करणें. विशेष. परगणें इंदूर व बोधन दोनी परगणे हजरत बंदगान अल्ली यांनीं श्रीमंत पेशव्यांस दिले. त्याजकडून राजश्री श्रीनिवास शामराव यांनीं मामलत करून घेऊन आले आहेत. त्याजपाशीं हजरतानीं दोनी महाल सुपूर्द करून देण्याविषयीं आमचे नावें इनायतनामा लिहून दिल्हाच, बजिनस आहे. तो दस्तऐवज घेऊन दोनी महाल स्वाधीन करून रसीद घ्यावी. आमचे सरंजाम खाली वगैरे गेले. सरंजाम व घोडे व तट्टू, गूर व नगदीं. वगैरे दरोबस्त जिन्नस दोनी महालांतील पत्रें पोहोंचल्यावर चार दिवस महसूल जिन्नस काढून नवी पेठ व आरमूर येथें पाठवावें. चार दिवसांत सरंजाम काढितां बाकीं राहिल्यास, श्रीमंत राजश्री गोविंदराव बापूकडून वे।। राजश्री त्रिंबक वैद्य आले आहेत, यांचे निमा अवघे सरंजाम करून वे।।चे हातीं यादास्त घेऊन ठाणेसुद्धां दोनी महाल त्याचे स्वाधीन करावे. बाकी राहिले सरंजामाकरिता वे।।जी जफ्तीवालेस बोलून आपण आणखी चार दिवस तेथें राहून तुमचे सरंजाम अवघे काढून देतील. अतःपर उजूर न करितां दोनी महाल वे।।चे विद्यमानें चार दिवसांचे कराराप्रमाणें सरंजाम काढून घेऊन मागून सुपूर्द करणें. उजूर न करणें. आह्मांकडून राजश्री व्यंकट नरसूपंत यास पाठविलें असे. यांनीं वे।।पाशीं राहून सरंजाम काढवून देतील. राजश्रीनीं सांगितल्यांप्रमाणें अमलांत आणावें. मानसीक न करावें. बहुत काय लिहिणें लोभ कीजे. हे विनंति.
छ २४ जिल्हेज. मु।। भागानगर.
रवाना टप्यावर.