[५८]                                                                       श्रीव्यंकटेश प्रसन्न.

मोहर पारसी.

एकलास दस्तगाह जलोल महमदखा नायब परगणे इंदूर व बोधन यांस. राजे त्रिमलराव गुणवंत बहाद्दूर दुवा सु।। १२०४ फसली. इंदूर व बोधन दोनी परगणे हजरत बंदगान अल्लीबहादर यांनीं श्रीमंत पेशवे यांस देऊन दोन महाल त्यांचे सुपुर्द करून देण्याविषयीं आमचे नांवें इनायतनामा करून दिले आहेत. इनायतनामा घेऊन त्याजकडून राजश्री श्रीनिवास, शामराव यांनीं महालास आले आहेत. तर येथें श्रीमंत राजश्री गोविंदराव बापूचे विद्यमाने करार ठरला की, आमचे पत्र तुह्मांस पोहोंचल्यावर चार दिवस आवध करून चार दिवसांमध्यें आमचे सरंजाम, गल्ला वगैरे कुल जिन्नस दोनी महालांतून काढून घेऊन अगर चार दिवसांत सरंजाम काढिता, आणखी सरंजाम बाकी राहिल्यास तो सरंजाम श्रीमंत बापूसाहेबांकडून राजश्री त्रिंबक वैद्य आले आहेत, याचे जिमा करून वोकडून यादास्त तुह्मीं घेऊन पांचवे दिवशीं बजिन्नस इना यतनामा आमचे नांवाचे रसीद दोनी घेऊन मग दोनी महाल ठाणेंसुद्धां राजश्री श्रीनिवास शामराव याचे स्वाधीन करावयानिमित्य आह्मांक राजश्री व्यंकट नरसूपंत कारकून यांस पाठविलें असे. याचे विद्यमानें सरंजाम काढून इनायतनामा व रसीद घेऊन दोनी महाल त्याचे सुपूर्द करावें. राजश्रीनीं सांगितल्याप्रमाणें अमलांत आणावें. मानसींक व करावा. कळलें पाहिजे. हे किताबत.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries