Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[५७] श्री. ८ जुलै १७९५.
विनंति विज्ञापना. इंदूर बोधन या महालीं सरकांतून राजश्री श्रीनिवास शामराव कमाविसदार आले. ठाणीं दाखल होण्याकरितां नवाबाकडील अमिलाच्या सोडचिठ्या पाठवाव्या; ह्मणून मशारनिल्लेंकडून निळो बापूजी कारकून आह्मापाशीं आले. त्यावरून नवाबाशीं बोलून त्रिमलराव अमील हरदो महालचे यास ताकीद करवून त्याच्या सोडचिठ्या ठाणीं व तालुका सरकारचे कमाविसदाराचे स्वाधीन करण्याविषयीं घेऊन कमाविसदाराकडील कारकुनासमागमें आह्मीं आपला एक कारकून व सोडचिठ्या व त्रिमलराव याचाही कारकून दखल करून देण्याकरितां, याप्रमाणें छ १७ जिल्हेजीं इंदूर, बोधनाकडे रवाना केले. त्रिमलराव याचे सोडचिठ्याच्या नकलाही सेवेशी रवाना केल्या आहेत. त्यावरून ध्यानास येईल. र ॥ छ २० जिल्हेज. हे विज्ञापना.
त्रिमलराव यांनी सोडचिठ्या दिल्या त्याच्या नकला.