Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[६१] श्री. १२ जुलै १७९५.
विनंति विज्ञापना. सदाशिव रड्डी यांचें सूत्र बेदर येथील किल्ल्यांत कोणी जमातदार याजकडे होतें. आंदोलाहून सदाशिव रड्डी जमीयतसुद्धां जाऊन किल्ल्यास शिड्या लावून किल्ला शहरासुद्धां घेतला. किल्ल्याचा बंदोबस्त करून सदाशिव रड्डी तेथून निघून शिद्दी अबदुल्ला जमीयत पांच सातशें स्वार पैदळ मिळून हजार बाराशें बेदरचे किल्ल्याचे हिफानतीस जाणार होता. त्यास मार्गीं अचानक आडवें झाल्यानंतर त्याची याची लढाई झाली. शिद्दी अबदुल्लाकडील. कित्येक लोक ठार, जखमी शेदोनशें व कांहीं फरारीं झाले. अबदुल्लास सदाशिव रड्डीनें धरून पाडाव करून नेलें. दुसरें वर्तमान :-शिद्दी अबदुल्लास रड्डीचे लोकांनीं घेरा घालून धरिलें. तो कबजांत आला तेव्हां लढाई व तरवार न चालतां धरून नेला. हें एक वर्तमान. दुसरें वर्तमान कीं, अगोदर सदाशिव रड्डीनें शिद्दी अबदुल्लास हस्तगत करून मग बेदरचें किल्ल्यास लागून किल्ल्यांत खबर केली कीं, शिद्दी अबदुल्ला जमीयतसुद्धां बंदोबस्तास आला आहे. त्यावरून यास किल्लेदारानें आंत घेतलें. जमीयतसुद्धा किल्ल्यांत पोहोंचून बंदोबस्त केला. ऐशीं एक दोन वर्तमानें आहेत. वास्तव्य काय असेल तें असो तात्पर्य बेदर घेतलें, शिद्दी अबदुलास धरून नेलें, हें खचीत. नवाबाकडे वर्तमानें आलीं. बेदरचे किल्ल्याचे दरवाजाकड सदाशिव रड्डी जमीयत घेऊन गेला. दरवाजाचे रुखास लढाई दाखविली. किल्ल्यांत दोनतीनशें माणूस होतें, तें तेवढें दरवाजाचे रुखास जमा झालें. किल्ला, खालीं. याप्रमाणें डाव करून जिकडून दादासाहेब कैलासवासी यांनीं महाकाली तोफ बेदरास लाविली होती, त्याबाजूनें सदाशिव रड्डी याजकडील जमयतीची दुसरी तुकडी होती, त्यांनीं शिड्या लावून तट चढून आंत शिरले. किल्ला घेतला. शिद्दी अबदुल्ला बेदरापासून चार सहा कोस उतरला होता, त्याजवर जाऊन शेदोनशें लोक कापून काढिले. शिद्दीस दोन चार जखमा भारी लागल्या होत्या. ठार झाला. जखमी लोक फार झाले. ते हैदराबादेस दाखल झाले. शिद्दीची बायको व कन्या पोटकटारी करून मेल्या. असें कोणी सांगतात. कोणाचें ह्मणणें त्यांनीं धरून नेल्या. सारांश, सदाशिव रड्डीनीं किल्ला घेतला. शिद्दी अबदुला यास जमीयतसुद्धां बुडविला. हे तहकीक खबर. र।।छ २४ जिल्हेज. हे विज्ञापना. शिद्दी अबदुलबरोबर पन्नास हजार होन होते, ते त्यास सांपडले. घेऊन गेले. हे विज्ञापना