Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
समक्ष लढाई पाहिली. स्वार पायदळ सरकारचे शे दोनशे पडले. जखमी सरकारचे जाहाले त्यास इनामें बहुत दिली. जखमीनेहि दिले. फिरंग्यांचा नाश बहुत सात आठशे माणसाचा जाहाला. अशी आवई सायंकाळ पावेतों आली. शहरात चौकी पाहारे यांचा बंदोबस्त रोज गु॥ प्रमाणेंच होऊन तोफ शनवारचे वाडयांतच जाहाली. द्वादशी रविवारी वर्तमान उठलें स्वारी माहुलीस गेली, कांही फौज पंढरपुराकडे कर्नाटकांतून पलटणें आली त्याजवर रवाना जाहाली, अल्पिष्टीण नगरास गेले. त्रयोदशीस वर्तमान इंग्रजांचे लोकांत फितुर करून लोक पळवीत होते, ते शिपाई व ब्राह्मण सांपडले. त्यापैकी एक आदमी प्यादा रामजी लोकरे यांस गळीं मि॥ म॥ रीं दिल्ही. गळीं देते समयी गावांत फिरवून दवंडी फिरविली कीं इंग्रजाचा शिपाई फितुर केला सबब गळी देतात. याप्रमाणें जाले. ब्राह्मण तीन चार अ॥ कैदेंत ठेविले. व॥ १४ पासून झाडून वाटा बंद करून माणसांचे झाडे घेऊन कागदपत्र जाण्याचें बंद केले. अमावस्येस याचप्रमाणे वाटांचे बंदोबस्त जाले. पौष शु॥ १ पावेतों सदर्हू प्रों बंदोबस्त झाले. शु॥ २ सायंकाळी आवई उठली, पंढरपुराकडून दोन हजार गाडद व हजार तुरुक स्वार, अठरा तोफा या प्रो कर्नाटकची पलटणें आली, ती माहुलीकडेस स्वारीकडेस गेली. या प्रों वर्तमान आले. शु॥ ३ वर्तमान शहरांत बोलू लागले, कोरेगाव कुमठे येथें पंढरपुराकडून पलटणें आली, त्यांची लढाई झाली, सरकारचे फौजेनें दोन पलटणें गारद केली, सरकारची फौज दोन तीन हजार गारद जाली. याप्रमाणें बोलू लागले. शु॥ ४ व शु॥ ५ सदर्हू प्रों वर्तमान सारे शहरांत बोलू लागले. दोन पलटणें मारिली. सरकारची फौज पांच चार हजार पडली. त्रिंबकजीस जखम लागली. नारोपंत आपटयास गोळी लागली. याप्रों अवया आल्या. शु॥ ६ मंगळवारी याब॥ आवया उठल्या. सायंकाळचे प्रहर दिवसास झाडून सरकारचे झेंडे भगवे चावडयांवरचे व पेठेंतून होते त्यांची भगवी निशाणें काढून काठया होत्या त्या काढून टाकिल्या व फिरंग्यांची निशाणें त्यांचे जवळ होतीं ती मात्र ठेविली. याप्रों वर्तमान जालें. शु॥ ७ वर्तमान स्वारी मिरजेस गेली. फौजा झाडून कोरेगाव, कुमठें, वांगी वगैरे जागोजाग आहे. फिरंगी याचीं पलटणें शिराळे याचे रोखानें आहेत. याप्रों वर्तमान बोलू लागले. शु॥ ८ वर्तमान. सरकारची फौज निरेचे पुलाजवळ कांही आली. श्रीमंत निपाणीस गेले. याप्रों बोलू लागले. शु॥ ९ वर्तमान. सरकारी फौज झाडून मिरजेस रोखासच आहे. श्रीमंत निपाणीस गेले. इंग्रज दोन तीन पलटणें बारामती, शिरोळ वगैरे रोखास आहे. अल्पिष्टीण साहेबहि गारदवंडेकडून बारामतीस गेले. याप्रमाणें बोलूं लागले. शु॥ १०, सदर्हू प्रमाणेंच वर्तमान बोलू लागले.
समाप्त