Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

रात्रौ शिरस्तेप्रमाणें तोफ जाहाली. मित्ती व॥ १ बुधवारचें वर्तमान. फिरंगी खासा अल्पिष्टीण साहेब बुणगे घेऊन नगरास गेला. कोणी ह्मणते घोडनदीसच आहे, असेंहि बोलतात. खासा स्वारी आली. कोणी ह्मणते घोडनदीसच आहे, असेंहि बोलतात. खासा स्वारी अकळोजेस आहे, गोखले वगैरे जेथच्या तेथे आहेत, शहरातूंन लोक भारी बाहेर जात आहेत, होळकर येऊन मिळाला असें ह्मणतात. कोणी ह्मणतें होळकर याची फौज अजून फार लांब आहे. असें वर्तमान बुधवार सायंकाळपर्यंत जाहालें. शिरस्तेप्रमाणे तोफ जाहाली. पुढें द्वितीयेंचे वृत्त गोविंदराव लिहितील. मार्गशीर्ष व॥ २ गुरुवारचें वर्तमान. बापू गोखले यांचे मुलास देवआज्ञा स्वारीत जहाली. बापू गोखले समाचारास गेले होते ते परत आपले लष्करांत आले, असेंहि लोक बोलतात. व गणपतीचे रांजणगांवी गोविंद बक्ष याचे पांच सातशे स्वार आले होते, त्याजवर छापा सरकारचे स्वारींना घोलोन कांही मारिले व कांही पळाले, असेंहि लोक बोलतात. याप्रमाणें सायंकाळ पावेतों होऊन तोफ शिरस्ते प्रो. जाली. वद्य ३ शुक्रवारचें वर्तमान. श्रीमंताची स्वारी ब्राह्मणवाडयाचे घाटावर लिंगदेवास आहे असेंहि लोक बोलतात व इंग्रज घोडनदीस एक पलटण राहून बाकी नगरास गेले, सरकारचे स्वार चरवली पावेतों येऊन गावगन्ना वसूल नेतात, व तोफखाना मिरजेकडे मागें सरकारचा राहिला होता तो व दुसऱ्या आणखी तोफा मिरजेच्या वगैरे मिळोन व गाडदी व काटक पायदळ जमवून स्वारीत पोचल्या असेंहि लोक बोलतात. धारवाडाहून बलारीकडून दोन पलटणें इंग्रजाची घेऊन घोडनदीस पोचली असेंहि लोक बोलतात. या प्रो सायंकाळ पावेतों वर्तमान होऊन शि॥ प्रो तोफ जाली. वद्य ४ मंदवारीं वर्तमान उठलें की बापू गोखले याची सून सती गेली व लोहगडास एक पलटण रवाना जालें. कोणी ह्मणतात इंग्रजाच्या बायका मुंबईस जात आहेत त्या सबब घाटाचे वगैरे बंदोबस्तास गेले. कोणी ह्मणतात लोहगडावर मोहीम केली. दुसरे वर्तमान. सुवर्णदुर्गचा किल्ला पाण्यांतून धुळपांनी गलबतें आणिली व पायमार्गे नारोपंत आवटी यांनी जाऊन हल्ला करून घेतला. या प्रो सायंकाळ पावेतों वर्तमान होऊन शि॥ प्रो तोफ जाली. इ॥ व॥ ५ ता॥ व॥ ७ पावेतों वर्तमान कांही उठले नाहीं. अष्टमीस दोन प्रहरी शहरांत हूल भरली की श्रीमंतांची स्वारी फुलगावास आली, पेंढार वगैरे हजार दोन हजार स्वार तलाव्यास खंडोबाचे माळावर आले, इंग्रजाचे लोक दोन धरून नेले वगैरे. दापोडी आसपासचे गाव झांबडले या आवईनें शहरांत रस्त्यांत लोक माणसावर माणूस पडलें. अशी हूल तीन वेळ सायंकाळ पावेतों भरली. फिरंगी याचे पहारे नाक्यावरी झाडून गाठोडीं बांधून तयार जाले. कोणी बोलूं लागले छापा येतो. कोणी बोलू लागले की शहर घेतात. असें वर्तमान होऊन शिरस्तेप्रमाणे तोफ जाहाली. नवमीस प्रात:काळीच याप्रमाणें हूल भरली. फौज कवडीचे मु॥ आली ह्मणोन आवई येऊन, फिरंगी झाडून तयार होऊन किरकोळ नाक्यावर प्यादे होते ते जमवून, बुधवार वाडयाशी शंभर व गद्रे यांचे वाडयाशी शंभर, व शनवारचे हणमंताजवळ पन्नास, याप्रमाणे (शिरा) याचे रोखाचे रस्त्याचे बंदोबस्त केले. गारपीरचे खटले रास्ते याचे वाडयांत भरून, वाडयाचे रस्ते रोखोन तोफा गाडद वगैरे बंदोबस्त केला. जुने वाडयाचे दिल्ली दरवाजावरील बंगल्यावरचे गच्चीवर एक तोफ चढविली. या प्र॥ बंदोबस्त फिरंग्याचा जाहाला. तोफ शिरस्तेप्रमाणे जाहाली. दशमीस वर्तमान उठलें कीं कोरेगावचे मु॥ दोन पलटणे घोडनदीकडील येत होती त्याची बातमी लष्करात कळली व त्याचे दुमदारीवर पुरंधरे वगैरे फौज होती ती व स्वारीतील फौज हि त्याचे अंगावर जाऊन लढाई मोठी जाहाली. एक पलटण मारिले, याप्रमाणे आवई आली. सायंकाळी शहरात हूल भरली शहरावर छापा येतो. असेंहि लोक बोलू लागले. फिरंगी याचे लोक बुधवार चावडीवर पाऊणशे अ॥ पावेतों तयार, चौकीपाहारा खडा, याप्रमाणें जागोजाग बंदोबस्त केले. जुने वाडयावर दिल्ली दरवाज्यावर दुसरी तोफ आजच चढविली. रोजची तोफ शिरस्त्याची वाडयावरची केली. व॥ ११ मंदवारीं वर्तमान नवल विशेष नाही. अल्पिष्टीण नगराकडून फिरून श्रीमंतांचे फौजेचे दुमदारीवर आला. कोरेगांवी लढाई जाहाली. खरी स्वारी जेजुरीचे रोखास आहे. फौज सारी सरकारी फुलगांव, कोरेगांव, सासवड, जेजुरी पावेतों पसरली आहे. कोरेगावचे लढाईस श्रीमंत बाबासाहेब फुलगांवचे टेकडीवर उभे होते.