Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३४३] श्री. २१ सप्टंबर १७४०.
श्रीमत्परमहंस स्वामी यांही बाजी अनंत मुक्काम पिंपरी यांस आज्ञा केली ऐसीजे :-
तुह्मांस कार्यास एके जागीं पाठविणें आहे. तरी तुह्मी आश्विन वदि त्रयोदशीस धावडशीस निघोन येणें. गांवचें एक घोडें स्वारीस पाठवावयास बराबर गांवक-यांजवळ मागोन घेऊन येणें. त्रयोदशीस येथें आलास नाहीं ह्मणजे तूं आमचा चाकर न्हवस. चाकरीवरून दूर केला जाईल ऐसें समजोन त्रयोदशीस येणें. धरफळेबाबद रु ॥ दीडशें जेतजी चौगुल्याकडेस तेथें ठेविले आहेत ते त्याजपासून मागोन घेऊन येणें. जाणिजे. छ १० रज्जब. हे आज्ञा. बेरड एक माळशिरसचा बराबर घेऊन येणें. जाणिजे. हे आज्ञा.
श्री.
राजश्री जगन्नाथ चिमणाजी यासी आज्ञा केली ऐसीजे :-
तुह्मी आपले लोक व गांवकरी व तमाम जमावानिशीं धावडशीपासून मोरखिंडीपावेतों रान काढावयाची आज्ञा केली आहे. तरी तुह्मी जाऊन रान काढणें. बहुत काय लिहीन.