Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

तथापि, संकलितार्थे विनंति करित्यें कीं, हरणैस देवालय नूतन करून स्थापना केली ऐसें ऐकोन, स्वामी संतोषी होऊन राहतां इतकेंच राहेल ह्मणोन आज्ञापिलें; तरी आरंभिल्या कार्यापासून उत्तीर्ण व्हावें याविचारें देवाची स्थापना करून, कुलाबां जातों ऐसें स्वामीचे सेवेसी लिहून पाठविलेंच होतें. कीर्ति अपकीर्ति रहावयाचा अर्थ; तरी शेवट होईल तो खरा. आपण हे राज्य टाकून जात असतां, राजश्री बाजीराऊ यांणी फिरविलें ह्मणून तरी हे गोष्टी त्यांणी उचितच केली. स्वामीसारिखे तपखि ज्या राज्यांत नाहींत तेथे श्रेयस्कर किंवा राज्याभिवृध्दी आहे ऐसे नाहीं. अन्यथा स्वामीस हे भूमंडळ अनुकूल. जेथें गमन करिजेल तेथें सन्मानच होईल. कैलासवासी यांजशी मैत्री केल्यापासून यावज्जीव त्यांचे गुणागुण व हस्तीचे वेळेचे श्रमाचे स्मरण करून आपण लिहिलेंत : तरी त्यांची व स्वामींचा ऋणानुबंध कोणेप्रकारचा होता तो अर्थ स्वामीचा स्वामीच जाणोत. अन्यत्रांस काय कळे? चित्तवित्त तुह्मांकडे बुडालें व अग्नीर्पण जाहालें ते निरुपायच गोष्ट होऊन गेली. आह्माकडे असेल त्याजविशी गतवर्षी सुवर्णदुर्गी असतां आपण लिहिलें होतें. त्याजवरून चिरंजीव सेखोजी बावा यांस लेहून पाठविलें त्यांनीही मान्य केलें जे शनि:शनि परिहार करून, स्वामीचा आशीर्वाद संपादून घ्यावा. ऐसें त्यांचे चित्तांत येऊन, आह्मांसही लेहून पाठविलें होतें. पुढे घडोन यावें तों त्यांचा प्रसंग तसा होऊन सर्वांसच श्रम प्राप्त जाहाले. त्याजमागें चिरंजीव संभाजी बावा आहेत. त्यांसही आह्मी सांगोन तेही स्वामीचे सेवेसी चुकणार नाहींत. स्वामीनीं त्यांचे ठायी कृपा करून, पूर्ण आशीर्वाद देऊन, एकाचे एकवीस श्रीनें विस्तार करावा. प्रस्तुत त्यांजवरी गगन कोसळतें यापरी मनसबियाचा भार येऊन पडला आहे. यास आधार एक स्वामीच्याच आशीर्वादाचा आहे. कृष्णंभटाचे देशमुखीचा विचार पूर्वील लिहिला.