Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३४४] श्री.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री जगन्नाथपंत स्वामी गोसावी यांसी :-
पोष्य रामाजी महादेव स॥ नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित असिलें पाहिजे. विशेष. आपण पत्र पाठविलें ते पावलें. लेखनाभिप्राय सविस्तर कळला. ऐशास, श्रीस्थळीं यावें. आपणांस बोलावूं पाठवावें, हा संकेतच. परंतु इंग्रजांचे बखेडे यामुळें प्रस्तुत उरणपर्यंत जाणें प्राप्त जालें आहे. जाऊन मनोदयानुरूप कार्यसिध्दी जाली ह्मणजे तिकडून येतां श्रीचें दर्शनास येऊन हर्षयुक्त आनंद उत्साह करून, मग श्रीची आज्ञा घेऊन पुढें जाऊं. आपण श्रीची प्रार्थना बहुत प्रकारें करावी आणि जातांच कार्य मनोदयानुरूप होय तें करावें. पेढे येथील पूर्ववत्प्रमाणें श्रीकडे वसूल द्यावा ह्मणोन गोविंदगडी लिहिलें असे. सारांश, इंग्रेजांनी नजर फिरविली आहे. त्याचें पारपत्य श्रीनें करावें. आपण प्रार्थना करावी. वे॥ नरजोशी व बाळकृष्णभट गणपुले पेढेयाचे वसुलीविशीं कजिया करतील. तरी तैसें नसावें. तो ऐवज श्रीचा कोठींत राहून खर्चवेच श्रीचे आज्ञेप्रमाणें व्हावा याप्रमाणें करावें. ब्राह्मण भांडों लागतील, बखेडा होईल, ऐसे नसावें. सूचनापूर्वक लिहिलें आहे. निमित्य, आपणाजवळ सारा अर्थ बोलिलों असो. हे विनंति.