Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

तरी जो कैलासवासीयामागें प्रसंग जाहाला तो चिरंजीव बावास न कळे ऐसा नाहीं. प्रस्तुत अंत:प्रभूस निमें वतन करून दिल्हें तें तुजला कळलें असेल असें लिहिलें. तरी पहिल्या प्रसंगा अलीकडेस काय जालें असेल ते न कळे. चिरंजीव बाबाचा रुका पैकी नलगे, जोडिले राज्य जतन करावें, येणेंकरून आपण सुखी आहों ह्मणोन आज्ञा. तरी यांत अपूर्व काय आहे ? कैलासवासीयांचा आपला याच रीतीचा अकृत्रिम, नि:सीम, ऋणानुबंध होता. ते निघोन गेलें. स्वामी मागें आहेत. त्यांच्या वंशाचें इष्ट इच्छून न्यून पूर्ण करावें हें तों स्वामीस उचितच आहे. अनिष्ट चिंतिलें तरी स्वर्गीं स्वामीस हांसतील ! एतदर्थी संशय आहे ऐसें नाहीं. मनसबा जतन व्हावयास स्वामीचा आशीर्वाद पूर्ण असावा. त्यांणी स्वामींची कृपा संपादावी तरी त्यांचे लेंकु पण. त्यांचे बुध्दीची प्रागभ्यता जाहाल्वरी निष्ठेस अंतर न करीत. देकार्यांवरी किंवा स्वामिकार्यावरी तत्पर असावें ऐशी मजला आज्ञा: तरी जसा संस्कार असेल तसें घडेल. भेटीचा हेत, यास्तव प्रपंच सोडून श्रीकृष्णस्नानाचे निमित्यें येऊन भेट देणें. सर्व आहे तें तुझेंच आहे., ह्मणोन: तरी यांत अन्यथा नाहीं. भेटीची उत्कंठा अहोरात्र लागलीच आहे. तीर्थ आणि स्वार्थ ऐसे दोनी अर्थ सिध्द होतील, यास ईश्वरीच्छा प्रमाण ! प्रपंचाचा अर्थ : तरी प्रपंचच जेव्हां छत्र गेले तेव्हांच प्रपंचत्याग करून यथाज्ञानें कालपरत्वें जें होतां होईल ते भगवद्भजन होतेंच आहे. प्रपंचगुहेमध्यें वास असोन केवळ प्रपंचाचें दूरीकरण कसें होऊं पाहातें ? यास्तव, दोनी विचार स्वाधीन जालेच आहेत. वरकड कर्तेपणाचा आटोप असोन, बुध्दिनीत सांगोन, मनसबा चालघावा, हें कोणास मानत नाहीं हा अर्थ आज्ञापिला: तरी देवदेव करून कालक्रमणा करावी हाच विचार बरा आणि प्राप्त प्रसंगास उचित आहे. लाभलाभ विचार होणें तें समयीं होतात, तें उत्तम जाणोन राहाटी करावी. विचार कोठवरी लिहावा ? स्वामी सर्वज्ञ आहेत. कृपा करावी. हे विज्ञापना.