Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[१८८]                                                                       श्री.                                                           

यादी कलमें सरकार राजश्री जानोजी भोसले सेनासाहेबसुभा :-

हुजूर कैलासवासी स्वामीचे वेळेचा
ऐवज नजरेचा व कर्जाचा वाड्यांतील,
पैकीं दरसाल रुपये ५००००
पन्नास हजार तीर्थरूप कैलासवासींनी
करार केले आहेत. त्याप्र॥
सेनासाहेबसुभा यांची नजर रुपये
७,५००००.
याचे वायदे
२५०००० सन समान साल
अखेरपर्यंत.
राजश्री राणोजी भोसले यांसी पेषजी
तीर्थरूप कैलासवासीचे वेळेस. आपण
दरसाल रुपये २५००० पंचवीस हजार
मक्ता केले. त्याप्रमाणें साल दरसाल.
२५०००० सन तिसा सालपर्यंत
२५०००० सन सितैन सालपर्यंत
२५०००० सन सितैन सालपर्यंत
----------------
७,५०००००
आपणाकडे रुपये १०,००० दहा
हजार वेतनाच्या असाम्या नेमून दिल्या
आहेत, बित॥
५००० राघोपंत वोक
२५०० आपाजी महादेव
२५००० रामचंद्र महादेव
----------
१००००
एकूण साडेसात लक्ष वायद्याप्रमाणें.
राजश्री राणोजी भोसले यांसी पेषजी
तीर्थरूप कैलासवासीचे वेळेस आपण
दरसाल रुपये ५०,००० पन्नास हजार
आपले विद्यमानें करार. त्या प्र॥ दरसाल.
बाळापुरी कापड पोषाखी रुपये
५००० पांच हजारांचे सालास.
शेखमिराच्या परगणियाचा तह येथें ठरला
आहे. त्याप्रमाणें दरसाल करारा प्रमाणे.
कैलासवासी स्वामीचे नजरेचा व
वाड्यातील कर्जाचा ऐवज आह्मी
देणे, त्यापैकी दोन तीन लक्षांचा
हवाला मुदतीप्रणे घ्यावा. ह्मणून
आपण सांगितले त्यास, एक वर्षाचे
मुदतीचे दोन तीन लक्ष पर्यंत हवाले.
वराडचे गांव आपले मोकासे आहेत,
तेथील इजारे आह्माकडील लोकांनी केले
असतील ते सोडून देववूं.
प॥ जामोद येथील जहागीर आपण
आह्मांकडे दिली आहे. तेथील
सरदेशमुखी दरसद्दे रुपये १२॥
साडेबाराप्रमाणें करार केले असेत.
आपला कारकून द्यावा त्यांजकडे.

प्र॥ वराड येथील बाबती सरदेशमुखीची
साल दरसाल मक्ता द्यावा.

२,०००००     राजश्री पंत प्रतिनिधी
                 हप्ते
                  १,००००० पौष अखेर
                  १,००००० ज्येष्ठ अखेर
                                     आषाढ मासी
                ------------------------
                 २,०००००
   २५,०००   बाबती पैकीं नजर साल
                 दरसाल, निमे पौष मास,
                 निमे आषाढ.
-------------------
२,२५०००

प॥ वासीम परगणें वासीस व शिरपूर
येथील असाम्या कैलासवासी
तीर्थरूप यांनी दिल्या आहेत त्या प्र॥.
एकूण दोन लक्ष पंचवीस हजार वायद्या-
प्रमाणे द्यावे. सालची बाकी द्यावी.
किले धोडप येथील जागीर वराड प्रांते
आहे, त्याचा तह कैलासवासी तीर्थ-
रूपांनी चालविले आहे. त्या प्र॥.
चिरंजीव राजश्री मुधोजी भोंसले व
बिंबाजी भोंसले यांसी सरंजामपैकी
वाटणी तह रुपये १५००००० पंधरा
लक्षांचा सरंजाम आपले विद्यनें
द्यावयाचा तह ठरला आहे, बमोजीब
याददास्त अलाहिदा करून दिल्या
आहेत. येणेंप्रमाणें.
लंग O

 

एकूण चौदा कलमें रास सु॥ सबा खमसैन मया अलफ.